एका महिन्यापूर्वीच राष्ट्रवादी अर्बन सेलने पोलिस व महापालिका आयुक्त यांना यासंदर्भात पत्र देऊन नायलॉन मांजाच्या विक्रीस अटकाव घालण्याची मागणी केली होती. दुर्दैवाने कोणतीच कारवाई न केल्यामुळे पुणेकर नागरिक जखमी होत आहेत. प्रशासन पुणेकर नागरिक जखमी व मृत्युमुखी पडायची वाट पाहते का ?-नितीन कदम, अध्यक्ष, राष्ट्रवादी अर्बन सेल, पुणे शहर.मागील काही वर्षापासून पॉलिमर, नायलॉन व काचेचा थर वापरून मांजा तयार केला जात आहे. त्यामुळे मांजा धारदार होऊन बोटे, मान, पाय कापले जातात. मांजामुळे जखमी झालेले प्राणी, पक्षी आणि माणसांना आम्ही निःशुल्क सेवा देतो. तसेच याबाबत आम्ही जनजागृती करून मांजा हटाओ, जान बचाओ अभियान राबवले जाते. गेल्या सात दिवसांत शहरात 50 ते 52 घटना घडल्या आहेत. मांजापासून वाचण्यासाठी नागरिकांनी घराबाहेर पडताना गळ्याला मफलर बांधावा.– डॉ. कल्याण गंगवाल, सर्व जीव मंगल प्रतिष्ठान, पुणे.
हेही वाचा