मंडई मेट्रो स्थानकाच्या नावबदलाचा निर्णय महामेट्रोकडील कमिटीच्या बैठकीत घेतला जाणार आहे. या विषयावर चर्चा झाल्यानंतर शासनाच्या मार्गदर्शक तत्त्वाचा अभ्यास करून नाव बदलण्यासंदर्भातील निर्णय होणार आहे, असे मेट्रोच्या अधिकार्यांनी सांगितले.
मंडई मेट्रो स्थानकाचे नाव बदलून ‘महात्मा फुले मंडई मेट्रो स्टेशन’ असे करा, अशी मागणी शहरातील विविध संघटना आणि संस्थांकडून केली जात आहे. त्यामुळे मेट्रोकडूनही यासंदर्भातील हालचाल सुरू करण्यात आली आहे. आगामी काळात लवकरच होणार्या कमिटीच्या बैठकीत या विषयावर चर्चा केली जाणार आहे. हा विषय उचलून धरून मंडई स्थानकाचे नाव बदलून ‘महात्मा फुले मंडई’ असे केले जाणार असल्याचे मेट्रोकडून सांगण्यात आले आहे.
मंडई मेट्रो स्थानकाचे नाव ‘महात्मा फुले मंडई मेट्रो स्टेशन’ करण्या-संदर्भातील विषय कमिटीच्या मीटिंगमध्ये चर्चिला जाणार आहे. या मीटिंगमध्ये कमिटी मेंबर शासन निर्णयातील मार्गदर्शक तत्त्वांचा अभ्यास करून नावबदलासंदर्भातील अंतिम निर्णय घेतील.
हेमंत सोनावणे, कार्यकारी संचालक महाव्यवस्थापक, महामेट्रो