पुणे: भूमिअभिलेख विभागातील तक्रार अर्ज, अपिल यांच्या ऑनलाइन सुनावणीसाठी प्रत्यय ही प्रणाली आणली आहे. आता याच धर्तीवर प्रत्यय प्रणालीचा वापर महसूल विभागातही करण्याचा विचार शासन करत आहे.
या सुविधेमुळे तहसीलदार, प्रांताधिकारी, अतिरिक्त जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त, अपर मुख्य सचिव महसूल यांच्या स्तरावर ऑनलाइन पध्दतीने अपिल दाखल करता येणार आहे. तसेच नोटीस, रोजनामा, सुनावणीची तारीख, निकालपत्र आदिंची माहिती या प्रणालीद्वारे नागरिकांना मिळण्यास मदत होणार आहे.
जमीनविषयक दाव्यांची सुनावणी महसूल अधिकार्यांकडे होते. प्रांताधिकारी यांच्याकडे दाव्याचा निकाल लागल्यानंतर पुढील अपील अतिरिक्त जिल्हाधिकारी यांच्याकडे दाखल होते. त्यामुळे याठिकाणी दाखल होणार्या दाव्यांची संख्याही मोठी असते. परिणामी या कार्यालयात येणार्या नागरिकांची संख्या जास्त असते.
विशेषतः ग्रामीण भागातून येणार्या नागरिकांची संख्या यामध्ये लक्षणीय आहे. दोन-तीन तास प्रवास करून नागरिकांना दाव्याच्या सुनावणीसाठी यावे लागते. सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास दाव्यांची सुनावणी सुरू होते. परंतु सकाळपासूनच पक्षकार व वकिलांची गर्दी होण्यास सुरू होते.

कधी कधी ऐनवेळी सुनावणी रद्द होते, त्याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागतो. हे चित्र बदलण्यासाठी तसेच पक्षकार व वकील यांचा वेळ वाचविण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातही ही प्रत्यय प्रणाली लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठीची संगणक प्रणाली विकसित करण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. येत्या महिनाभरात ही प्रणाली लागू होइल, अशी माहिती महसूल विभागातील सूत्रांकडून देण्यात आली.