आता ढगफुटी, पूरस्थितीचा अचूक अंदाज देता येणार

3 ते 6 कि. मी. अंतरावरील हवामानाचे अंदाज देणे शक्य
cloud burst
ढगफुटी Pudhari
Published on
Updated on

आजवर जवळची ढगफुटी अन् पूरस्थितीचा अंदाज देण्यात अचूकता नव्हती. कारण, त्या क्षमतेचे वेगवान महासंगणक आपल्या हवामान विभागात नव्हते. मात्र, आता 3 ते 6 कि. मी. अंतरावरील ढगफुटीसह पूरस्थिती अंदाज तीन ते पाच दिवस आधी देता येईल. इतक्या ताकदीचा ‘अर्क’ नावाचा 850 कोटी रुपये किमतीचा महासंगणक कार्यान्वित झाला. त्याचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी दिल्लीतून ऑनलाइन केले होते. पुणे शहरातील पाषाण भागात इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रोलॉजी (आयआयटीएम) ही हवामानात संसोधन करणारी संस्था असून, ती दक्षिण आशिया खंडातील महत्त्वाची संस्था मानली जाते.

या ठिकाणी महासंगणक आहेत. मात्र, ते 4 पेटा फ्लॉप क्षमतेचे आहेत. त्यामुळे आजवर आपल्याला 12 कि. मी. उंची किंवा लांबीवरच्या अंतरावरचे हवामानाचे अंदाज देता येत होते. 3 ते 6 कि.मी. अंतरावर काय होणार, याचा अंदाज देता येत नव्हते. तसेच, पूरस्थिती किंवा मोठा पाऊस, ढगफुटी यांचे अंदाज अधिक अचूक देता येत नव्हते. त्यासाठी सरकारने विदेशी बनावटीचा ’अर्क’ नावाचा पहिला महासंगणक आयआयटीएम या संस्थेत बसवला आहे. तर, दुसरे महासंगणक नोएडा येथील पृथ्वी विज्ञान मंत्रालयाच्या संस्थेत बसवण्यात आला आहे. या महासंगणकाला ’अरुणीका’ असे नाव दिले आहे.

अशी आहे क्षमता

अर्कची गती ही जुन्या महासंगणकापेक्षा सुमारे चौपट म्हणजे 11.77 पेटा फ्लॉप इतकी असून, साठवण क्षमता : 33 पेटाबाईट्स आहे. यात कृत्रिम बुद्धिमत्ता व मशिन लर्निंग प्रणाली यात समाविष्ट आहेत.

हा संगणक 75 टक्के विदेशी बनावटीचा आहे. सी- डॅकने तयार केलेले भारतीय बनावटीचे महासंगणक निराळे आहेत. याची क्षमता प्रचंड असून, तो काही क्षणांत कोट्यवधी गणित सोडवतो. रडारने दिलेले रीडिंग आणि अंदाज यावरून हवामानाचे अंदाज अधिक वेगवान देता येतील. हे अंदाज आयआयटीएम ही संस्था भारतीय हवामान विभाग (आयएमडी)कडे देईल. तेथून ते नागरिकांपर्यंत जातील.

डॉ. सूर्यचंद्र राव, प्रकल्प संचालक, आयआयटीएम, पुणे.

काय होणार फायदा...

आजवर आपल्याला 12 कि.मी. अंतरावरचे अंदाज देता येत होते. मात्र, त्यापेक्षा जवळच्या अंतरावरचे हवामान अंदाज देता येत नव्हते. आता 3 ते 6 कि. मी. अंतरावरचे अंदाज देता येतील. यात चक्रीवादळ, अतिवृष्टी, विजांचा कडकडाट, नेमक्या किती अंतरावर, गारपीट, उष्णतेच्या लाटा, दुष्काळ यांचा अंदाज किमान 3 ते 6 दिवस आधी देता येईल.

आजवर आमच्या संस्थेत चार पेटाफ्लॉप क्षमतेचे महासंगणक होते. गेल्या अनेक वर्षांपासून 12 पेटाफ्लॉप क्षमतेचा संगणकाची प्रतीक्षा होती. ती आता संपली. याचा आम्हाला खूप फायदा होईल. रडार जे रीडिंग दाखवते, त्याचे गणित अत्यंत वेगाने या संगणकावर करता येईल. हे महासंगणक रडार आणि सॅटेलाइटच्या रीडिंगचे काही क्षणांत गणित सोडवून देईल. त्यामुळे दोन- तीन दिवसांचे काम अवघ्या अर्ध्या तासात होईल. संस्थेत तीन हजार चौ.फूट जागेत हा महासंगणक बसवला असून, त्याची अचूकता प्रचंड आहे. त्यामुळे आपले हवामानाचे अंदाज अचूक देता येणे शक्य होईल.

डॉ. पानी मुरली कृष्णा, प्रमुख, आयआयटीएम, पुणे

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news