Pune Crime: सराईत गुन्हेगार विकास उर्फ काज्या चोरे स्थानबद्ध; शिरूर पोलिसांची धडक कारवाई

२०२२ ते २०२५ या काळात त्याच्याविरुद्ध शिरूर पोलिस ठाण्यात एकूण पाच गुन्हे नोंदवले गेले आहेत.
Pune Crime
सराईत गुन्हेगार विकास उर्फ काज्या चोरे स्थानबद्ध; शिरूर पोलिसांची धडक कारवाईPudhari
Published on
Updated on

पुणे: शिरूर पोलिस ठाण्याच्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार विकास उर्फ काज्या बाबाजी चोरे (वय २५, रा. डोंगरगण, ता. शिरूर) यास एमपीडीए कायद्याखाली स्थानबद्ध करण्यात आले आहे. चोरे याच्यावर वारंवार प्राणघातक हल्ले करून जिवे मारण्याचा प्रयत्न, विनयभंग, गावठी पिस्तुले जवळ बाळगून दहशत निर्माण करणे, तसेच अवैध मुरुम उत्खनन व वाहतूक करणे असे गंभीर गुन्हे दाखल आहेत. २०२२ ते २०२५ या काळात त्याच्याविरुद्ध शिरूर पोलिस ठाण्यात एकूण पाच गुन्हे नोंदवले गेले आहेत.

पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल यांच्या शिफारशीवरून आणि जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांच्या आदेशानुसार शिरूर पोलिसांनी विकास चोरे याला ताब्यात घेऊन शनिवारी (दि. २०) मध्यवर्ती कारागृह अमरावती येथे रवाना केले.

Pune Crime
Illegal Water Bottles: सावधान! तुम्हीही बाटलीबंद पाणी पिताय? पुण्यात एक हजार 284 अनधिकृत पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या जप्त

गेल्या दोन वर्षांत शिरूर पोलिस ठाण्याने पाच सराईत गुन्हेगारांना स्थानबद्ध करून तालुक्यातील गुन्हेगारीवर कडक आळा घातला आहे. पुढेही एमपीडीए, मोक्का तसेच भारतीय न्याय संहितेतील कलमान्वये कठोर कारवाई केली जाणार असून गुन्हेगारांची गय केली जाणार नाही, असा इशारा शिरूरचे पोलिस निरीक्षक संदेश केंजळे यांनी दिला.

Pune Crime
Pune Railway Station: पुणे रेल्वे स्थानकावर 51 लाखांची रोकड जप्त; रेल्वे सुरक्षा बलाची स्थापनादिनी कारवाई

ही कारवाई पोलिस उप अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलिस अधिकारी प्रशांत ढोले, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक शुभम चव्हाण, सहायक फौजदार महेश बनकर, हवालदार मंगेश थिगळे, परशराम सांगळे तसेच पोलीस कर्मचारी सचिन भोई, नितेश थोरात, अजय पाटील, विजय शिंदे, निखील रावडे, अंबादास थोरे व निरज पिसाळ यांनी केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news