Maharashtra politics: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना एकटे पाडण्याच्या प्रकारात तथ्य नाही: चंद्रशेखर बावनकुळे

तीनही पक्षांचे काम व्यवस्थित सुरू आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री शिंदे यांच्यात संवाद आहे.
Chandrashekhar Bawankule
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना एकटे पाडण्याच्या प्रकारात तथ्य नाही: चंद्रशेखर बावनकुळेPudhari Photo
Published on
Updated on

पुणे: महायुतीचे 237 आमदार आहेत. 51 टक्के मते घेऊन आम्ही सत्तेवर आलो आहोत. राज्यातील 14 कोटी जनतेची देवेंद्र फडणवीस सरकारला मान्यता आहे. तीनही पक्षांचे काम व्यवस्थित सुरू आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री शिंदे यांच्यात संवाद आहे.

त्यांनी दररोज एकमेकांबरोबर बोललेच पाहिजेत असा आग्रह कशासाठी? न बोलताही ते काम करत आहेत. यामुळे देवेंद्र फडणवीस यांना एकटे पाडण्याचा हा प्रकार आहे का? या प्रश्नांला काहीही अर्थ नसल्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले. (Latest Pune News)

Chandrashekhar Bawankule
Pune Politics: भाजपसाठी तोडफोड! प्रभागरचनेवरून काँग्रेस-राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आरोप

पुण्यातील मानाच्या गणपतींचे दर्शन घेण्यासाठी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे मंगळवारी (दि.2) रोजी पुणे दौर्‍यावर होते. कसबा गणपतीबरोबरच शहरातील मानाच्या पाचही गणपतींचे त्यांनी दर्शन घेतले. त्यानंतर ते माध्यमाशी बोलते होते.

बावनकुळे म्हणाले की, ‘मराठा समाजाला आरक्षण देताना एकाच्या ताटातील काढून ते दुसर्‍याच्या ताटात देण्यास राज्य सरकारला अजिबात रस नाही. तर मराठा समाजाला टिकणारे आरक्षण द्यायचा आमचा प्रयत्न आहे’

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news