

no rain in maharashtra from june 6 to 10 scientists predict
पुणे : राज्यात हवेचा दाब वाढल्याने मान्सून एकाच जागी ब्रेक लावल्या सारखा थांबला आहे. हे दाब दोन दिवसांत आणखी वाढणार असल्याने 30 मे ते 6 जून पर्यंत उघडीप राहिल. त्यानंतर पुन्हा पुढे ही उघडीप 10 जून पर्यंत वाढू शकते. त्यामुळे शेतक-यांना कामे करण्यास पुरेसा कालावधी आहे. अशी माहिती कृषी हवामान तज्ज्ञ डॉ. रामचंद्र साबळे यांनी दिली आहे.
राज्यात मान्सूनपूर्व पाऊस खूप जास्त पडल्याने शतक-यांना मशागतीची कामे करताचा आली नाही. पावसाचा जोर इतका होता की जमीनीला वाफसा येईल की नाही. मशागतीची कामे करता येतील की नाही. या बाबत शेतकरी चिंतेत सापडला आहे. या बाबत हवामान तज्ज्ञांचे मत घेतले असता त्यांनी सांगितले की, आता पावसात मोठा खंड पडू शकतो.कारण हवेचे दाब राज्यात वाढले आहेत. त्यामुळे पहिल्या टप्प्यांत 30 मे ते 6 जून तर दुस-या टप्प्यात 6 जून ते 10 जून असा खंड राहू शकतो.
ज्येष्ठ कृषी हवामान तज्ज्ञ डॉ. रामचंद्र साबळे म्हणाले की, मान्सूचा प्रवास हा हवेचा दाब अन वा-याची दिशा, वेग या मुख्य तीन घटकांवर चालतो. समुद्रावर हवेचा दाब 1010 होते तर राज्यात ते 1000 हेक्टा पास्कल इतके होताच मान्सून अंदमानातून केरळ मध्ये अवघ्या 13 दिवसांत आला. पुढे महाराष्ट्रात अधिक वेगाने आला. कारण मुंबईसह पुण्यात हवेचा दाब हे 998 झाले होते. त्यामुळे मान्सून विक्रमी वेळेत आला. मात्र आता हवेचा बाद हा 1006 झाला. वारे हे जास्त दाबाकडून कमी दाबाकडे वाहतात. त्यामुळे वा-याचा वेग दाब वाढल्याने मान्सून वेग मंदावला आणि पाऊसही थांबला आहे.