कोरोना काळता डिजिटल स्वरुपाची लग्नपत्रिकेला मागणी वाढली होती. मात्र आपली प्रथा, परंपरा मागे पडू नये. तसेच प्रत्यक्ष भेटून पत्रिका दिल्याने नात्यातील गोडवा वाढतो. पाहुणे मंडळीदेखील मोठ्या संख्येने लग्नसोहळ्याला उपस्थित राहतात.– मनीष नांगरेछपाई लग्नपत्रिका देवापुढे ठेवता येते. आपल्या घरातील मंदिरांमध्ये तसेच आपल्या कुलदेवतांच्या समोर छपाई पत्रिका ठेवू शकतो. मात्र, आनलाईन पत्रिका ठेवता येत नाही. लग्नसोहळा संपूर्ण परंपरेने पार पडला पाहिजे.– माधुरी शिंदे महिला