बावडा : पुढारी वृत्तसेवा : निरा नदीचे पात्र तसेच नदीवरील अनेक कोल्हापूर पद्धतीचे बंधारे सध्या कोरडे पडले आहेत. त्यामुळे इंदापूर व माळशिरस तालुक्यातील नदीकाठच्या शेतकर्यांना पिके जगविण्यासाठी कसरत करावी लागत आहे. निरा नदीचे पात्र कोरडे ठणठणीत पडल्याने सराटी येथील नदीवरील कोल्हापूर पद्धतीचा बंधारा एक महिन्यापूर्वीच कोरडा पडला आहे. या व इतर बंधार्यांच्या पाण्यावर अवलंबून असणारी चारा व इतर पिके सध्या धोक्यात आली आहेत.
जनावरांच्या चार्याचा प्रश्नही निर्माण झाला आहे. शिवाय आगामी काळात पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवणार असल्याचे गोंदी-ओझरे गावचे सरपंच रणजित वाघमोडे, प्रगतशील शेतकरी सिद्धार्थ पाटील (बावडा), सागर सवासे (बोराटवाडी), किरण पाटील (चाकाटी) यांनी सांगितले. निरा नदीचे पात्र कोरडे पडल्याने इंदापूर व माळशिरस तालुक्यातील नदीकाठच्या गावांमध्ये सध्या काळजीचे वातावरण निर्माण झाले आहे, असे निरा भीमा साखर कारखान्याचे संचालक व निरनिमगावचे सरपंच प्रतापराव पाटील यांनी
नमूद केले.
हेही वाचा