Pune New Terminal| नवीन टर्मिनल अखेर सुरू

ले. कर्नल मनीषा डबास ठरल्या पहिल्या प्रवासी
Pune New Terminal
नवीन टर्मिनल अखेर सुरूFile Photo
Published on
Updated on

बहुप्रतीक्षित नवीन विमानतळ टर्मिनल अखेर रविवारी (दि. १४) सुरू झाले. पुण्यातील मान्यवर आणि केंद्रीय हवाई राज्यमंत्र्यांच्या उपस्थितीत हे टर्मिनल सुरू करण्यात आले. टर्मिनलला आकर्षक विद्युतरोषणाईने सजविण्यात आले होते.

Pune New Terminal
आजचे राशिभविष्य | जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा जाईल? |सोमवार , १५ जुलै २०२४

टर्मिनल सुरू करण्यासाठी आलेल्या समस्या सोडवून अखेर रविवारपासून पुण्यातील नवीन टर्मिनल सुरू करण्यात आले. केंद्रीय हवाई राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, खासदार मेधा कुलकर्णी, महापालिका आयुक्त राजेश भोसले, विमानतळ संचालक संतोष ढोके, केंद्रीय सुरक्षा बलाचे अधिकारी, विमान कंपन्यांचे अधिकारी यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून आणि केक कापून या टर्मिनलला हिरवा सिग्नल देण्यात आला.

नवीन टर्मिनलवरून पुण्याहून दिल्लीसाठी एअर इंडियाचे पहिले उड्डाण (फ्लाईट क्रमांक एआय-८५८) झाले. लेफ्टनंट कर्नल मनीषा डबास या नवीन टर्मिनलवरून प्रवास करणाऱ्या पहिल्या प्रवासी ठरल्या.

रविवारी दुपारी केंद्रीय हवाई राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते डबास यांना बोर्डिंग पास देण्यात आला. त्यानंतर एअर इंडिया एक्स्प्रेसचे पुण्याहून भुवनेश्वरसाठी दुसरे उड्डाण (फ्लाईट क्रमांक आय ५- ३२०) झाले. त्या विमानाच्या प्रवाशांनादेखील केंद्रीय राज्यमंत्री मोहोळ यांच्या हस्तेच बोर्डिंग पास देण्यात आला.

केंद्रीय मंत्र्यांच्या हस्ते बोर्डिंग पास मिळाल्यामुळे या प्रवाशांनी आनंद व्यक्त केला. मुरलीधर मोहोळ म्हणाले, गेल्या दहा वर्षांत देशात ७५ नवीन विमानतळे तयार झाली आहेत, ४६९ नवीन हवाई रस्ते मोदीजींच्या नेतृत्वात तयार झाले. गेल्या दहा वर्षांतील कामाचा आलेख पाहिला तर जगातील तिसरे सर्वात मोठे एव्हिएशन सेक्टर आपल्या देशाचे आहे.

Pune New Terminal
Warkari Pension Benefits| वारकऱ्यांसाठी आता पेन्शन योजना

हा प्रत्येक भारतीयांसाठी अभिमानाचा क्षण आहे. येत्या काळात या देशात २० ते २५ नवीन विमानतळे या देशात कार्यान्वित होत आहेत. आपण पाहिले नवीन टर्मिनल नववधू सारखे सजवण्यात आले होते.तर या नवीन टर्मिनलची खूप विशेषतः आहे. २२ हजार ३०० स्क्वे, मीटर जुन्या टर्मिनलचे क्षेत्रफळ होते.

आता ५२ हजार स्क्वे. मीटर नव्या टर्मिनलचे क्षेत्रफळ आहे. वर्षातून जवळपास ९० लाख ते १ कोटी प्रवासी येथून प्रवास करू शकणार आहेत. पहिल्या फेरीत आज एअर इंडिया आणि एअर इंडिया एक्स्प्रेसच्या सुविधा सुरू होत आहे.

रविवारी नवीन टर्मिनल येथून नऊ विमाने उखाणे करतील, तर तितकीच नऊ विमाने येथे उतरतील. उद्यापासून या संख्येत वाढ होणार असून, दिवसाला १६ विमानांची उड्डाणे आणि १६ विमानांचे आगमन नवीन टर्मिनलवर होईल. जुन्या विमानतळातील सर्व गोष्टी हळूहळू शिफ्टींग होतील. सीआयएसएफ जवान आणि पाच कन्व्हेयर बेल्टचीदेखील अत्याधुनिक सुविधा उपलब्ध आहे. यामुळे प्रवाशांचा प्रवास सुखकर होईल.

नवीन टर्मिनलचे उद्घाटन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपूर्वी केले होते. त्यामध्ये ऑपरेशन सुरू होण्यासाठी काही कामे राहिली होती, ती आता कामे पूर्ण झाली आहेत. त्यामुळे आता पुणेकर प्रवासी प्रत्यक्षात या टर्मिनलमधून प्रवास करू शकत आहे. महाराष्ट्राची संस्कृती आणि त्याला आधुनिकतेची जोड असलेले नवीन टर्मिनल पाहिल्यावर प्रवासी नक्कीच खुश होतील. आजपासून हे नवीन टर्मिनल कार्यान्वित झाले आहे, सर्व पुणेकरांना मनापासून शुभेच्छा.

- मुरलीधर मोहोळ, केंद्रीय हवाई राज्यमंत्री

सर्वप्रथम मी विमानतळ प्राधिकरण आणि पुण्याचे धन्यवाद करते. नवीन टर्मिनल सुरू करून प्रवाशांसाठी खूप मोठी सुविधा करण्यात आली आहे. पुणे दिवसेंदिवस विकास करत आहे आणि या विकसित टर्मिनलमधून पहिला प्रवासी म्हणून प्रवास करताना अतिशय आनंद होत आहे. ज्यांनी ज्यांनी हे टर्मिनल उभारण्यासाठी आणि सुरू करण्यासाठी प्रयत्न केले, त्या अधिकाऱ्यांचे, मंत्र्यांची खूप खूप आभारी आहे. सर्वसामान्य प्रवाशांसाठी केलेले हे काम खूपच कौतुकास्पद आहे.

- लेफ्टनंट कर्नल मनीषा डबास, पहिल्या प्रवासी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news