सर्व्हंट्स ऑफ इंडियामधील नवा घोटाळा बाहेर ; जमीन विक्रीत लाखोंचा कर चोरला

प्रयागराज शाखेच्या जमीन विक्रीत नवा घोटाळा
servents of India society
सर्व्हंट्स ऑफ इंडिया सोसायटीFile photo
Published on
Updated on

सर्व्हंट्स ऑफ इंडिया सोसायटीतील आणखी एक घोटाळा बाहेर आला आहे. उत्तर प्रदेशातील प्रयागराज शाखेतील पेचपेरवा या गावात असलेल्या संस्थेच्या जमीन विक्रीवरचा लाखो रुपयांचा कर चोरला असल्याचे उघडकीस आले आहे.

सर्व्हंट्सऑफ इंडिया सोसायटीने देशभरामध्ये सामाजिक उपक्रमासाठी कमावलेली मालमत्ता, जमिनीचा उपयोग जनकल्याणाकरिता व्हावा म्हणून तत्कालीन सदस्य, अध्यक्ष, सचिव अशा पदाधिकार्‍यांनी सांभाळून ठेवलेली जमीन धर्मादाय आयुक्तांची कुठलीही परवानगी न घेता विद्यमान संस्थेचे अध्यक्ष दामोदर साहू, सचिव मिलिंद देशमुख आणि वरिष्ठ सदस्य पी. के. द्विवेदी यांनी 73 लाख 14 हजार रुपये किंमतीची जमीन नाममात्र 17 लाख रुपयांना परस्पर विकली. या व्यवहारात झालेल्या जमिनीवरच्या किमतीवरचा कर प्राप्तिकर विभागाला कायद्यानुसार भरणे बंधनकारक आहे. मात्र, हा कर संस्थेने आजवर भरलाच नाही. याची चौकशी करण्यासाठी सर्व्हंट्स ऑफ इंडिया सोसायटीचे सदस्य प्रवीण कुमार राऊत यांनी प्राप्तिकर विभागाकडे तक्रार केली आहे. तसेच, पुढील कारवाई होण्याबाबत स्मरणपत्र देत पाठपुरावा घेतला, तेव्हा संस्थेने प्राप्तिकर बुडवून त्यावर लागलेल्या दंडाची, तसेच हा कर कुठल्या तरतुदीतून भरला जाईल, याकडेही लक्ष वेधले.

गुरुवारी फौजदारी प्रकरणावर सुनावणी सर्व्हंट्स ऑफ इंडिया सोसायटीचे अध्यक्ष दामोदर साहू सचिव मिलिंद देशमुख, वरिष्ठ सदस्य पी. के. द्विवेदी यांना आपल्या मुलांना व नातवाला संस्थेत आजीवन सदस्य करून घेण्यासाठी संस्थेची मालमत्ता परस्पर विकणे, फौजदारी गुन्हे दडपण्यासाठी संस्थेचा पैसा बे-मालूम वापरणे असे प्रकार सर्रास सुरू असल्याचे आरोप होत आहेत. देशमुख यांच्यावर तीन फौजदारी अदखलपात्र गुन्हे नोंदवले गेले आहेत. न्यायालयात जामिनाच्या प्रकरणात 3 ऑक्टोबर, गुरुवारी सुनावणी होणार आहे.

मी या कर चोरीबाबात सर्वप्रथम नोव्हेंबर 2023 मध्ये तक्रार अर्ज पुणे येथील प्राप्तिकर कार्यालयात दिला होता. त्याबाबत 14 फेब्रुवारी 2024 रोजी कारवाईबद्दल माहिती मागवली. त्यावर प्राप्तिकर विभागाने 20 फेब्रुवारी 2024 रोजी कारवाई सुरू असल्याचे पत्र मला दिले. त्यावर पुढे काय कारवाई झाली, याबाबत पुन्हा 1 ऑक्टोबर 2024 रोजी स्मरणपत्र दिले.

प्रवीणकुमार राऊत, तक्रारदार

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news