Pune NCP Withdrawal Operation: पुण्यात राष्ट्रवादीचे ‘ऑपरेशन माघारी’; सात ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत

दोन्ही राष्ट्रवादी गटांना बंडखोरांची समजूत काढण्यात अंशतः यश, तरीही काही उमेदवार ठाम
NCP Unity
NCP UnityPudhari
Published on
Updated on

पुणे: अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग््रेास आणि शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग््रेास यांनी बंडखोरांची तसेच आगाऊ एबी फॉर्म दिलेल्या उमेदवारांची समजूत काढण्यासाठी दिवसभर कसून प्रयत्न केले. त्याला बऱ्याच अंशी यश आले असले तरीही किमान 7 ठिकाणच्या उमेदवारांनी अर्ज मागे घेण्यात अपयश आले. तेथे मैत्रीपूर्ण लढत होणार असल्याचे पक्षाकडून सांगण्यात आले.

NCP Unity
Dhayari Ward 35 BJP Unopposed: धायरी प्रभाग ३५; भाजपचे मंजूषा नागपुरे व श्रीकांत जगताप बिनविरोध

अंतिमत: राष्ट्रवादी काँग््रेासकडून 130 पेक्षा जास्त आणि शरद पवार गटाकडून 43 उमेदवार निवडणूक लढवणार आहेत. आघाडीमध्ये राष्ट्रवादी काँग््रेास 125 जागांवर, तर राष्ट्रवादी काँग््रेास शरदचंद्र पवार पक्ष 40 जागांवर निवडणूक लढविणार असल्याचे सूत्र निश्चित झाले होते. मात्र, प्रत्यक्षात दोन्ही पक्षांनी दिलेल्या एबी फॉर्मची बेरीज 165 पेक्षा किती तरी अधिक होत होती. त्यामुळे उमेदवारी माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी दोन्ही पक्षांचे युद्धपातळीवर प्रयत्न सुरू होते.

NCP Unity
Pune Municipal Election Shiv Sena: पुणे महापालिका निवडणूक; शिवसेना स्वबळावर; एबी फॉर्म वादाने खळबळ

शरद पवार राष्ट्रवादीचे प्रवक्ते अंकुश काकडे, विशाल तांबे, मनाली भिलारे आदींनी गुरुवारपासून ‌‘ऑपरेशन माघारी‌’ सुरू केले होते. पहिल्या दिवशी अपेक्षित यश आले नाही. मात्र, शुक्रवारी त्यांनी थेट उमेदवारी अर्ज भरलेल्यांना काढण्यासाठी मोहीम सुरू केली. एक उमेदवार हडपसर परिसरात प्रचारात गुंतला असल्याचे समजताच हडपसरकडे मोर्चा वळवला. त्यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर त्याने माघार घेतली. अजित पवार पक्षातील पर्वतीमधील उमदेवार शिवाजी गदादे पाटील यांच्या विरोधात अर्ज भरलेल्याची समजूत काढण्यात या पथकाचा बराच वेळ गेला. अशा प्रकारे किमान 15 उमेदवारांची समजूत काढण्यात यश मिळाले. मात्र, किमान 7 ठिकाणी उमेदवारांनी हट्ट सोडला नाही. त्यामुळे तेथे मैत्रीपूर्ण लढत होणार आहे.

NCP Unity
Political Activism Satire: जनहिताची कळकळ आणि राजकीय कार्यकर्त्यांची गंमत

राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने स्वत: व विशाल तांबे आणि मनीषा भिलारे यांनी अनेक ठिकाणी उमेदवारांचा शोध घेऊन त्यांना अर्ज मागे घेण्याबाबत विनंती केली. काही उमेदवारांची जिजाई बंगल्यावरच गाठ पडल्याने त्यांच्याशी ही समोरासमोर चर्चा करण्यात आली. काही जणांना भेटून, तर काहींना फोनद्वारे अशा जवळपास 15 हून अधिक उमेदवारांशी चर्चा करून अर्ज माघारी घेण्यात यश मिळवले आहे.

अंकुश काकडे, प्रवक्ते, राष्ट्रवादी काँग््रेास शरद पवार पक्ष

NCP Unity
Mahavitaran New Electricity Connection: नवीन वीज कनेक्शन आता ठरलेल्या कालमर्यादेतच

राष्ट्रवादी काँग््रेासकडून काही इच्छुकांनी उमदेवारी मिळाली नसल्याने बंडखोरी करत अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यांनी पक्षाच्या विनंतीला मान देऊन माघार घेतली आहे. हे सर्व जण पक्षसंघटनेत परतले असून, कामाला सुरुवात केली आहे.

प्रदीप देशमुख, प्रवक्ते, राष्ट्रवादी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news