Nasrapur Case : नसरापूरचा आक्रोश! चिमुरडीवरील अत्याचार आणि हत्येच्या निषेधार्थ सलग तिसऱ्या दिवशी कडकडीत बंद

व्यापारी संघटनेचा मोठा निर्णय, अत्यावश्यक सेवा वगळता सलग ७२ तास गाव बंद
Nasrapur Case : नसरापूरचा आक्रोश! चिमुरडीवरील अत्याचार आणि हत्येच्या निषेधार्थ सलग तिसऱ्या दिवशी कडकडीत बंद
Published on
Updated on

नसरापूर : नसरापूरमध्ये एका साडेतीन वर्षाच्या चिमुरडीवर एका नराधम वयोवृद्धाने दगडाने ठेचून खून केल्याची घटना घडल्याने सलग तिसऱ्या दिवशी देखील नसरापूर व्यापारी व ग्रामस्थानी अत्यावश्यक सेवा वगळता बाजारपेठ बंद ठेवून शासनाचे लक्ष वेधून घेतले आहे. तर सायंकाळी बाजारपेठ सुरू करण्याचा निर्णय ग्रामस्थ व्यापारी संघटनेच्या वतीने घेण्यात आला.

भोर आणि राजगड तालुक्याला जोडणारी महत्त्वाची बाजारपेठ असणाऱ्या गावात भीमाजी कांबळे वय ६५ या नराधम आरोपीने एका साडेतीन वर्षाच्या मुलीला गोठ्यातील पत्रा वजा शेडमध्ये नेऊन खून केला. ही घटना शुक्रवार दि. ( १ ) रोजी दुपारी साडेतीन वर्षाच्या सुमारास घटना घडली होती. या निषेधार्थ दोन दिवस पुणे सातारा महामार्ग रास्तारोको आंदोलन घटनेनंतर तिसऱ्या दिवशी देखील तिसऱ्या दिवशी सुद्धा नसरापूर बाजारपेठ बंद ठेवण्यात आली.

नसरापूर व्यापारी संघटना व ग्रामस्थांची रविवार ( दि. ३ ) मे रोजी निषेधार्थ बैठक घेण्यात आली. या बैठकीत नसरापूर बाजारपेठ रविवारी सायंकाळी बाजारपेठा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. यापुढे गाव बंद अथवा इतर अफवा सदृश सोशल मीडियावर येणाऱ्या निनावी संदेशाकडे लक्ष न देता ग्रामस्थ आणि व्यापारी संघटनेने घेतलेल्या निर्णयाचे संदेशाचेच पालन करण्याची आवाहन व्यापारी संघटनेच्या वतीने करण्यात आले.

माणुसकीचे दर्शन...

नसरापूरमध्ये झालेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर गेल्या तीन दिवसापासून मोठा पोलीस बंदोबस्त करण्यात आल्याने नसरापूर छावणीचे स्वरूप आले आहे. बंदोबस्तासाठी तैनात करण्यात असलेल्या पोलीस पथकाला अल्पपोहार व पिण्याचे पाण्याची व्यवस्था व्यापारी संघटनेच्या वतीने करण्यात आली होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news