

नारायणगाव : जुन्नर तालुक्यातील नारायणगाव येथील तरकारी मार्केटमध्ये गेल्या काही दिवसांपासून भाजीपाल्याची मोठ्या प्रमाणात आवक होत असल्याने बाजारभाव कोसळले आहेत. शिवाय तालुक्यात सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे भाजीपाला भिजत असून, त्यामुळे मागणी कमी होऊन शेतकर्यांना आपला माल अवघ्या किरकोळ दरात विकावा लागत आहे.
फ्लॉवरचा दर अवघा 15 रुपये किलो, तर कोबीचा भाव फक्त 3 रुपये किलो इतका घसरला आहे. मक्याचे कणीस 10 रुपये किलो, बीट 4 रुपये किलो, तर शिमला मिरची 35 रुपये किलो दराने विकली जात आहे. साधी मिरची 9 रुपये किलो, तर फरशी मात्र 60 रुपये किलो दराने विकली जात आहे.
घेवडा 30 ते 35 रुपये किलो, दुधीभोपळा 25 रुपये किलो, दोडका 25 ते 30 रुपये किलो, भुईमुगाची शेंग 60 रुपये किलो, भेंडी 15 रुपये किलो, वांगी 50 रुपये किलो, डांगर भोपळा 10 रुपये किलो दराने विक्री होत आहे.
वाटाण्याचा भाव 80 रुपये किलो, शेवग्याच्या शेंगा 40 ते 45 रुपये किलो, तोंडली 40 ते 45 रुपये किलो, हिरवी काकडी 13 रुपये किलो, तर पांढरी काकडी 50 ते 60 रुपये किलो दराने विकली जात आहे. पावट्याला 10 ते 13 रुपये किलो, गाजराला 25 रुपये किलो इतका भाव मिळत आहे.
पावसामुळे कोबी-फ्लॉवरसारख्या पिकांमध्ये घाण्या रोगाचा प्रादुर्भाव वाढल्याचे व्यापार्यांनी सांगितले. त्यामुळे बाजारात मोठी आवक असूनही गिर्हाईक कमी असल्याने दर घसरले आहेत.