दौंड शहरातील नगर महामार्ग 7 ऑक्टोबरला वाहतुकीसाठी बंद

दौंड-नगर महामार्गाचे नव्याने काम सुरु आहे
Road closed
महामार्ग बंदPudhari
Published on
Updated on

दौंड शहरातील नगर महामार्गावर असलेल्या रेल्वेपुलाचे गर्डर बदलावयाचे असल्याने सोमवार, दि. 7 ऑक्टोबर रोजी दिवसभर या महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे, अशी माहिती उपविभागीय अधिकारी मिनाज मुल्ला, रेल्वे प्रशासन व दौंड पोलिसांनी दिली आहे.

दौंड-नगर महामार्गाचे नव्याने काम सुरु आहे. या महामार्गावर दौंड शहरालगत असलेल्या रेल्वेच्या पुलाचे गर्डर बदलण्यात येत आहे. त्यामुळे सोमवार, दि. 7 ऑक्टोबर रोजी सकाळी 6 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत हे काम होणार आहे. या मार्गावरची वाहतूक पर्यायी नानविजमार्गे वळविण्यात येणार आहे, तरी वाहनचालकांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहनही प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news