मनपा विद्यार्थी शिकणार रोबोटिक्स , पायथन ,कोडींग

मनपा विद्यार्थी शिकणार रोबोटिक्स , पायथन ,कोडींग
Published on
Updated on

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शाळांमध्ये स्मार्ट सिटीअंतर्गत पायलट प्रोजेक्ट राबविला जात आहे. त्यानुसार माध्यमिक, प्राथमिक अशा 96 शाळांत स्मार्ट सिटीअंतर्गत स्टेम लॅब तयार करण्यात आली आहे.

सायन्स, मॅथ्स, टेक्नॉलॉजी यांची एकत्रित स्टेम लॅब बनविण्यात आली आहे. यातून पलिकेच्या विद्यार्थ्यांनाही रोबोटिक्स, पायथन, कोडिंग शिकता येणार आहे.

लॅब म्हटले की डोळ्यांसमोर फक्त विज्ञान हा विषय येतो. मात्र, विद्यार्थ्यांना पटकन न समजणारा आणि अवघड वाटणारा गणित हा विषयदेखील सोपा करून कसा शिकविता येईल यातून गणित लॅबची संकल्पना समोर आली. पुढे विज्ञान विषयाप्रमाणेच गणित विषयाच्या लॅब देखील शाळांमध्ये सुरू व्हायला लागल्या आहेत.

गणित विषय म्हटला की, रोजच त्याचा सराव करा. तरीही काही विद्यार्थ्यांना गणित हा विषय अवघडच जातो. त्यामुळे बर्‍याचदा गणित विषयाकडे दुर्लक्ष होते. पण हाच विषय अगदी आवडीचा कसा करता येईल यासाठी गणित सोप्या पद्धतीने प्रत्यक्ष कृतीद्वारे शिकवले जाणार आहे.

इयत्ता 5 वी ते 8 वी च्या मुलापर्यंत गणित सोप्या आणि कृतीयुक्त अशा प्रकल्पाची मांडणी केली आहे. यामध्ये विज्ञान व गणित अभ्यासक्रमातील असे घटक जे मुलांना समजण्यासाठी कठीण जातात ते निवडून त्यावर आधारित साधे प्रयोग आणि साहित्याची रचना करण्यात आली आहे. हा प्रकल्प महापालिकेच्या शाळांमध्ये राबविला जात आहे.

कोणताही विषय शिकताना प्रत्यक्ष कृतीद्वारे शिकला तर तो डोक्यात पक्का होतो. त्याबाबत कधीही प्रश्न विचारले तरीही त्याची उत्तरे आपल्याकडे तयार असतात.

प्रत्यक्ष कृतीद्वारे असे क्लिष्ट विषय शिकवले तर ते अधिक लक्षात राहतात. कृतीयुक्त शिक्षणाची जोड दिल्यामुळे विद्यार्थ्यांची मनातील गणिताची भिती दूर होवून गणिताची गोडी वाढणार आहे.

"खासगी शाळांमधील विद्यार्थ्यांना ज्या प्रकारचे प्रशिक्षण दिले जाते. ज्या तंत्रज्ञान व माध्यमांचा वापर केला जातो; त्याप्रमाणे सायन्स लॅब, कॉम्प्युटर लॅब, मॅथ लॅब आदी पूरक गोष्टींचा अंतर्भाव यामध्ये आहे. याबाबतचे प्रशिक्षण शिक्षकांना दिले गेले आहे."
– नीळकंठ पोमण, (सह मुख्य कार्यकारी अधिकारी, स्मार्ट सिटी)

"लॅबमध्ये 48 प्रकारची उपकरणे दिली आहेत. गणित व भूमितीमध्ये सांगायचे झाले तर पायथागोरस हे फळ्यावर शिकविले गेले. यामध्ये पायथागोरसचे एक मॉडेल दिले आहे. यात काटकोन, त्रिकोण, चौकोन वर्तुळ, अशी ब्लॉग सिस्टिमसारखे मॉडेल दिले आहेत. यातून गणिताच्या संकल्पना स्पष्ट करून दाखविल्या जातात."
-शेखर खैरमोडे, (प्रकल्प अधिकारी, म्युनिसिपल ई-क्लास रूम)

https://youtu.be/6Od5mMZ4sb8

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news