

मुदत संपल्याने संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासक नियुक्त
राष्ट्रीय कृषी बाजारात समावेश करण्याचा मार्ग मोकळा
पुणे : राज्यात उत्पन्नाच्या बाबतीत प्रथम क्रमांकाची आणि आशिया खंडातील सर्वात मोठ्या असलेल्या मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मंडळ मुदत संपल्याने (ऑगस्टअखेर) शासनाने बरखास्त केलेले आहे. तर प्रशासकपदी राज्याचे पणन संचालक विकास रसाळ यांची नियुक्ती केलेली आहे. त्यांनी सोमवारी (दि.१) मुंबई बाजार समितीच्या प्रशासक पदाचा पदभार स्वीकारला आहे. (Pune Latest News)
रसाळ यांनी पदभार स्वीकारताना मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव डॉ. पी. एल. खंडागळे, सहसचिव महेंद्र म्हस्के, उपसचिव डॉ. एम.वही. साळुंखे आदींनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. यावेळी अन्य अधिकारी-कर्मचारी उपस्थित असल्याचे सांगण्यात आले.