पुणे: सासूकडून हुंड्यासाठी होणार्या छळामुळे उच्चशिक्षित महिलेने फॅनला ओढणीने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना हडपसर परिसरातील हांडेवाडी भागात घडली. याप्रकरणी सासूविरुद्ध काळेपडळ पोलिसांकडून गुन्हा दाखल केला आहे.
दीपिका प्रमोद जाधव (वय 29) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. याबाबत दीपिकाच्या वडिलांनी काळेपडळ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सासू द्वारका नामदेव जाधव (रा. सातवनगर, हांडेवाडी रस्ता) हिच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकारशुक्रवारी (दि. 20) रात्री बाराच्या सुमारास घडला. (Latest Pune News)
पोलिसांनी दिलेल्या माहिती, दीपिका व प्रमोद यांचा 2017 मध्ये विवाह झाला होता. दीपिका हिने कृषी पदवीचे शिक्षण घेतले होते. ती एका खासगी कंपनीत नोकरी करत होती. तर, पती एका शासकीय कार्यालयात लिपिक म्हणून नोकरी करतो.
दरम्यान, विवाहानंतर सासू व पतीसोबत काळेपडळ येथील सातवनगरमधील एका इमारतीत राहण्यास होत्या. दीपिकाला एक मुलगा आहे. सासू सतत दीपिका हिला माहेरहून पैसे व सोने आणावे, यासाठी सतत छळ करीत होती. हुंड्यासाठी तिचा छळ सुरू होता.
सासूकडून होणार्या मानसिक व शारीरिक छळाला कंटाळून दीपिकाने शुक्रवारी रात्री सिलींग फॅनलाओढणीने गळफास लावून आत्महत्या केली. अधिक तपास पोलिस करत आहेत.
सासू व नणदेकडून विवाहितेचा छळ
कोंढवा परिसरात गर्भवती पत्नीच्या पोटावर लाथ मारल्याने तिचा गर्भपात झाल्याचा धक्कादायक प्रकार घडला. तर, पुन्हा मोठे लग्न लावून देण्यासाठी सासू व नणदेकडून त्रास दिला जात असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी पती आतिक सय्यद, सासू शेहनाज व नणंद आफरीन यांच्याविरुद्ध कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. याबाबत 24 वर्षीय पीडित विवाहितेने तक्रार दाखलकेली आहे.