

Pune mother absconding
पुणे : ससून रूग्णालयात प्रसुतीसाठी दाखल केल्यानंतर एक महिन्याच्या बाळावर उपचार सुरू असताना बाळाला सोडून आई ससून रुग्णालयातून पसार झाली. याप्रकरणी बाळाच्या आईवर बंडगार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
शीतल ऊर्फ सीता पवार (रा. सिद्धनाथ वाडी, वाई, सातारा) असे गुन्हा दाखल केलेल्या महिलेचे नाव आहे. याबाबत ऋषीकेश हनमंजू कनकावाड (25, रा. बी. जे. मुलांचे वसतिगृह, पुणे मूळ रा. नांदेड) यांनी बंडगार्डन पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार 29 सप्टेंबर ते 12 नोव्हेंबर दरम्यान घडला.
दि. 20 सप्टेंबर रोजी शीतल पवार हिला प्रसुतीसाठी ससून रुग्णालयात 24 नंबर वॉर्ड येथे दाखल करण्यात आले होते. प्रसुतीनंतर तिने एका मुलाला जन्म दिला. मात्र, मुलावर महिन्यापासून उपचार सुरू होते. या बाळाला उपचाराची व देखभालीची गरज असताना, बालकाचे कायदेशीर पालक आहे, हे माहिती असताना त्या मुलाला सोडून ती पळून गेली. याप्रकरणी बंडगार्डन पोलिसांनी तपास सुरू केला आहे.