

पुणे: मृगबहरातील मोसंबीचा हंगाम बहरल्याने गुलटेकडी मार्केट यार्डातील फळबाजारात मोसंबीची आवक वाढू लागली आहे. छत्रपती संभाजीनगर येथून बाजारात दाखल होणाऱ्या मोसंबीच्या तीन डझनाला शंभर ते पाचशे तर चार डझनाला तीस ते तीनशे रुपये दर मिळत आहे.
तर, किरकोळ बाजारात मोंसबीच्या किलोला 80 ते 100 रुपये दर मिळत आहे. मकर सक्रांतीचा दोन दिवसांवर आल्याने बोरांना मागणी वाढली आहे. मात्र, कडाक्याच्या थंडीमुळे बाजारातील बोरांची आवक रोडावली आहे. त्यातुलनेत मागणी जास्त असल्याने दरात दहा टक्क्यांनी वाढ झाली आहे.
राज्यातील डाळींबाचा हंगाम सुरू होण्यास महिनाभराचा अवकाश आहे. सद्यस्थितीत कर्नाटक, गुजरात येथून डाळींबाची आवक होत आहे. बाजारातील आवक जावक कायम असल्याने डाळींबाचे दर टिकून आहेत. तर, मागणी आणि पुरवठा यातील समतोलामुळे उर्वरित फळांचे भाव मागील आठवड्याच्या तुलनेत स्थिर असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली.
मार्केट यार्ड येथील फळबाजारात रविवारी (दि. 11) मोसंबी 25 ते 30 टन, संत्रा 25 ते 30 टन, डाळिंब 15 ते 20 टन, पपई 15 ते 20 टेम्पो, लिंबाची सुमारे दीड ते दोन हजार गोणी, कलिंगड 7 ते 8 टेम्पो, खरबूज 7 ते 8 टेम्पो, चिकू दोन हजार गोणी, पेरु 800 क्रेटस, अननस 6 ट्रक, बोरे 700 ते 800 पोती, तर गोल्डन सीताफळाची 10 ते 12 टन इतकी आवक झाली.
फळांचे भाव पुढीलप्रमाणे : लिंबे (प्रतिगोणी):
150-400, मोसंबी : (3 डझन) : 280-450, (4 डझन) : 280, संत्रा : (10 किलो) : 300-1000, डाळिंब (प्रतिकिलोस) : भगवा : 100-300, आरक्ता : 20-80, गणेश : 10-40, कलिंगड : 15-25, खरबूज : 15-35, पपई : 10-25, चिक्कू (दहा किलो) : 100-600, पेरु (20 किलो) : 300-500, अननस (1 डझन) : 100-600, बोरे (10 किलो) : चमेली 300-370, चेकनट 800-950, उमराण 120-150, चण्यामण्या 1200- 1500.