

Monsoon Update 2026 Maharashtra Monsoon News
पुणे : अरबी समुद्राच्या शाखेने महाराष्ट्रात आलेला मान्सून दहा दिवसांपासून अडखळला आहे. त्यामुळे राज्यात पाऊस नाही. मात्र, बंगालच्या उपसागरातील पूर्वोत्तर भारतात गेलेल्या शाखेने सुसाट प्रगती करीत बिहारमध्ये प्रवेश केला आहे.
मान्सून भारतात दोन शाखांद्वारे येतो. पहिल्या शाखेने बंगालच्या उपसागरातून अरबी समुद्र, श्रीलंका आणि केरळ पार करीत पुढे गोवामार्गे महाराष्ट्रात आला. ही शाखा सर्वांत वेगवान आणि लवकर सक्रिय होते. ही शाखा महाराष्ट्रातच अडखळली आहे. तर, दुसरी शाखा बंगालच्या उपसागरातून थेट ईशान्य भारतात गेली. त्या शाखेने रविवारी (दि.१४ जून) प. बंगाल आणि अर्धे बिहार राज्य व्यापले. त्यामुळे काही दिवसांत तो उत्तर प्रदेश व्यापेल, असा अंदाज आहे.
मान्सून मध्य महाराष्ट्रात अडखळला आहे. उत्तर भारतातील उष्ण वाऱ्यांनी त्याचा प्रवास थांबला. त्यामुळे राज्यात उष्णतेची लाट सक्रिय झाली आहे. विदर्भात पुन्हा पारा ४३ अंशांवर आहे. तर, उर्वरित भागात ढगाळ हवामानामुळे उष्मा प्रचंड जाणवत आहे.
सध्या उत्तरेतून आलेल्या उष्णवाऱ्यांनी महाराष्ट्रातील मान्सूनचे बाष्प खेचून नेल्याने तो सोलापूर ते बारामी पर्यंत च्या भागात येऊनही खोलंबला आहे.त्यामुळे २० जून पर्यंत राज्यात अशी स्थिती राहण्याची शक्यता आहे.२१ जून पासून राज्यातील बहुतांश भागात पावसाची शक्यता शास्त्रज्ञांनी वर्तवली आहे.