Weather update | आनंद वार्ताः नियोजित तारखेला मान्सून तळकोकणात, 7 रोजी पुण्यात दाखल होण्याची शक्यता!

शनिवारी दुपारी ३ वाजता सिंधुदुर्ग जिलह्यात दाखल, -वेग झाला किंचित कमी,आज पुण्यात, उद्या मुंबईत-येण्याची शक्यता
शनिवारी ६ जून रोजी मान्सून तळकोकणात दाखल झाला.आता तो वेगाने राज्यात पुढे जाईल असा अंदाज आहे.ते निळ्या रेषेत नकाशात दाखवले आहे.
शनिवारी ६ जून रोजी मान्सून तळकोकणात दाखल झाला.आता तो वेगाने राज्यात पुढे जाईल असा अंदाज आहे.ते निळ्या रेषेत नकाशात दाखवले आहे.
Published on
Updated on

पुणे ः महाराष्ट्रात लवकरच सर्वंत्र आनंद सरी सुरु होणार आहेत कारण शनिवारी दुपारी सिंधुदुर्ग जिल्ह्यात मान्सून दाखल झाला.दरवर्षी प्रमाणे तो वेळेवर कोकणात आला आहे.त्यांचा वेग किंचित मंदावला आहे.रविवारी तो पुणे तर सोमवार पर्यंत मुंबईत दाखल होईल असा अंदाज आहे.तळकोकणात तो ५ ते ७ जूनच्या सुमारास येतो.यंदा तो वेळेवर दाखल झाला आहे.

मान्सूनने शुक्रवारी गोवा राज्यात वेगाने प्रवेश केला होता.मात्र शनिवारी महाराष्टातील तळकोकणात येताना त्यांची गती किंचित कमी झाली आहे.वाऱ्याचा वेग ताशी ७० ते ८० वरुन ताशी ५० ते ६० इतका आहे.शनिवारी दुपारी ३ च्या सुमारास तो सिंधुदुर्ग जिल्ह्यात आला.रविवारी पुणे तर सोमवारी मुंबईत दाखल होण्याची शक्यता आहे.मान्सून राज्यात आला तरी वाऱ्यांना पाहिजे तेव्हढी बळकटी नाही.त्यामुळे शनिवारी बहुतांश भागात कडक उन्हासह ढगाळ वातावरणामुळे उकाडा जाणवत होता.

विदर्भात ऑरेंज,उर्वरीत भागात मध्यम पाऊस..

मान्सून तळकोकणात आला आहे.मात्र त्याचा जोर विदर्भात जास्त आहे.कारण हवेचे दाब त्या भागात कमी आहेत.गडचिरोली,गोंदिया,नागपूर, वर्धा,वाशिम या पाच जिल्ह्यांना ८ जून रोजी अतिमुसळधारेचा ऑरेंज अलर्ट तर कोकण,मध्यमहाराष्ट्र अन मराठवाड्याला ७ ते ९ जून या कालवधीत मध्यम पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे.

महाराष्ट्रातील आगमन (गेल्या 6 वर्षातील आढावा)

र्ष ---- आगमन तारीख --- तुलना

२०२६ --- ६ जून-------------वेळेवर आला

२०२५ ----- २५ मे ---------- १९९० नंतर सर्वात लवकर

२०२४ ----- २६ मे ------------ लवकर

२०२३ ----- २५जून ----------- सर्वात उशीरा

२०२२ ------ १३ जून ---------- साधारण वेळेत

२०२१ ------- ६ जून -------- वेळेवर

२०२० ------ ११ ते १४ जून ----- थोडा उशीर

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news