धक्कादायक ! अल्पवयीन मुलीवर महाविद्यालय आवारातच अत्याचार; दोघांना अटक

चार आरोपींमध्ये दोन अल्पवयीन विद्यार्थ्यांचा समावेश
girl Abuse
मुलीवर अत्याचारFile Photo
Published on
Updated on

शहरातील एका नामांकित महाविद्यालयाच्या आवारातच एका 16 वर्षीय अल्पवयीन मुलीवर चार जणांनी अत्याचार करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी ओम आदेश घोलप (वय 20) व स्वप्निल विलास देवकर (वय 22) यांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांना न्यायालयाने 27 सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. याप्रकरणात दोन अल्पवयीन मुलांवर गुन्हा दाखल केला आहे. याबाबत 16 वर्षीय पीडित मुलीने तक्रार दाखल केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी नामांकित महाविद्यालयात अकरावीच्या वर्गात शिकते. यातील एक मुलगा याच महाविद्यालयात शिकतो. तर इतर मुले दुसर्‍या महाविद्यालयात शिक्षण घेतात. इन्स्टाग्रामवरून पीडित मुलीची मुलांशी ओळख झाली होती. दरम्यान, मुलगी अल्पवयीन व अज्ञान असतानाही या मुलांनी तिच्याशी ओळख वाढवून व तिच्याशी संपर्क साधत तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. महाविद्यालयातील मुलांच्या स्वच्छतागृहात तर मुलीच्या घरी तसेच घराजवळील गल्लीत अशा ठिकाणी अत्याचार झाले आहेत. दरम्यान, अटक आरोपींना न्यायालयात हजर केले असता गुन्ह्याच्या अधिक तपासासाठी आरोपींना पोलिस कोठडी देण्याची मागणी सरकार पक्षातर्फे सरकारी वकील नितीन कोंघे यांनी केली. त्यानंतर न्यायालयाने आरोपींना 27 सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. या अत्याचाराचे व्हिडीओदेखील सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. चार मुलांनी तिच्यावर अत्याचार केल्याचे सांगितले जात असून, चारही मुले एकमेकांना ओळखत नसून, या मुलांनी वेगवेगळ्या ठिकाणी व वेगवेगळ्या वेळी अत्याचार केले आहेत. दरम्यान, ‘गँगरेप’सारखा हा प्रकार नसल्याचे पोलिसांनी सांगितले.

...असा आला प्रकार उघडकीस

कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यातील महिला अधिकारी संबंधित महाविद्यालयात एका कार्यक्रमानिमित्ताने गेलेल्या होत्या. त्यांनी मुली व महिला अत्याचारप्रकरणात जनजागृतीपर माहिती दिली. तेव्हा मुलीच्या एका मैत्रिणीने तिच्यासोबत घडलेल्या घटनेची माहिती त्यांना दिली. तसेच, तिचा व्हिडीओही असल्याचे सांगितले. नंतर महिला अधिकार्‍यांनी याप्रकरणात लक्ष घालून गुन्हा नोंद केला तसेच आरोपींना अटकही केली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news