Crime News: कुरकुंभ येथे अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण

दौंडमधील युवकावर गुन्हा दाखल
Crime News
कुरकुंभ येथे अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषणFile Photo
Published on: 
Updated on: 

याप्रकरणी एका नराधमावर दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राहुल संजय गव्हाणे (सध्या रा. दौंड) असे गुन्हा दाखल केलेल्या नराधमाचे नाव आहे. याबाबत पीडित मुलीने फिर्याद दिल्याची माहिती ठाणे अंमलदार बापू रोटे यांनी दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित कुटुंब गोळेगाव (ता. सिल्लोड, जि. छत्रपती संभाजीनगर) येथील असून, पाच महिन्यांपूर्वी ते पुणे येथे आले होते. संशयित आरोपी राहुल गव्हाणे याने वरील कुटुंबाला पुणे येथून कुरकुंभला आणत एमआयडीसी येथील चितळे प्लॉट या ठिकाणी असलेल्या भाड्याच्या रूमवर ठेवले होते.

मे 2024 ते 19 जुलै 2024 दरम्यान पीडित मुलगी, तिची आई, भाऊ व राहुल गव्हाणे असे एकत्रित राहत होते. अभ्यासाचा बहाणा करून राहुल पीडित मुलीबरोबर अश्लील चाळे करत होता. या प्रकाराला विरोध केल्यास राहुल हा पीडित मुलीला मारहाण करत होता.

हा प्रकार आईला सांगणार, असे पीडित मुलगी म्हटली होती. त्यानंतर राहुल याने तुला व तुझ्या आईला जिवे मारून टाकेन, अशी धमकी दिली. त्यानंतर भीतीने पीडित मुलगी शांत राहिली होती.

पीडित मुलीची आई बाजाराला गेली असता, पुन्हा राहुल याने या मुलीला जवळ ओढून अश्लील चाळे केले, तोंड दाबून तिच्या इच्छेविरोधात तिचे लैंगिक शोषण केले, तसेच पीडितेबरोबर अनैसर्गकि कृत्यही केले, असे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

हा गुन्हा औरंगाबाद येथील अजिंठा पोलिस ठाणे येथे दाखल झाला होता. घटनास्थळ कुरकुंभ येथील असल्याने तो गुन्हा दौंड पोलिस ठाण्यात वर्ग करण्यात आला आहे. त्यानुसार मंगळवारी (दि. 15) राहुल गव्हाणे याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news