

आळेफाटा: आळेफाटा (ता. जुन्नर) येथील मोबाईल चोरी प्रकरणाचा पर्दाफाश करण्यात आळेफाटा पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणी शेजारील अहिल्यानगर जिल्ह्यातील तीन जणांनाच्या टोळीला अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून 2 लाख एक हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असल्याची माहिती पोलीस निरीक्षक दिनेश तायडे यांनी दिली.
राहुल वारे (वय 22 रा डिग्रस मालुंजे ता. संगमनेर) किरण मेंगाळ (वय 22 रा. वडदरा बोटा ता. संगमनेर) सोमनाथ आगविले (वय 21 रा. साकुर ता. संगमनेर) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
याबाबत आळेफाटा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 18 फेब्रुवारी रोजी आळेफाटा बस स्थानकाच्या पाठीमागील बाजूला असलेल्या गॅलेक्सी मोबाईल शॉपीचे छताचे पत्र अज्ञात चोरट्यांनी उचकटुन दुकानांमध्ये प्रवेश करत विविध कंपन्यांचे एकूण 27 मोबाईल व रोख रक्कम असा ऐवज चोरीस गेल्याची फिर्याद आळेफाटा पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती.
त्यानुसार आळेफाटा पोलिस ठाण्याचे शोध पथक गुन्हे सदर गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेत असता गोपनीय बातमीदारानुसार मिळालेल्या माहितीनुसार सदर आरोपी हे आळेफाटा परिसरात येणार असल्याची माहिती मिळाली.
आळेफाटा पोलिसांनी सापळा रचून राहुल वारे, किरण मेंगाळ, सोमनाथ आगविले यांना दुचाकीसह ताब्यात घेत अधिक चौकशी केली असता त्यांनी सदरच्या गुन्ह्याची कबुली दिली. चोरीस गेलेले सर्व मोबाईल किरण इंगळे याचे घरातून जप्त करत त्यांना अटक केली. पोलिसांनी एकूण 2 लाख एक हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
सदरची कामगिरी पोलिस अधीक्षक पंकज देशमुख, अप्पर पोलिस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभाग पोलीस अधिकारी रवींद्र चौधर गुन्हा शाखेचे निरिक्षक अविनाश शिळीमकर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दिनेश तायडे, सहाय्यक फौजदार चंद्रा डुंबरे पोलीस हवालदार सुनील गिरी, विनोद गायकवाड, पंकज पारखे, अमित माळुंजे, नवीन आरगडे, शैलेश वाघमारे, ओमकार खुणे, गणेश जगताप यांनी केली.