CNG Price Hike: एमएनजीएलच्या सीएनजी गॅसच्या दरात वाढ

प्रतिकिलो अडीच रुपयांनी वाढ; नवा दर ९४.७५ रुपये
CNG Price Hike
CNG Price HikePudhari
Published on
Updated on

पुणे : पुणे शहर (पिंपरी-चिंचवडसह) तसेच चाकण, तळेगाव आणि हिंजवडी परिसरातील वाहनांसाठी वापरल्या जाणाऱ्या कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस (सीएनजी)च्या विक्री दरात प्रतिकिलो २.५० रुपयांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे आता सीएनजीचा नवा दर प्रतिकिलो ९४.७५ रुपये इतका झाला आहे. हे वाढीव दर बुधवारी मध्यरात्रीपासून लागू करण्यात येणार असल्याची माहिती महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड यांनी दिली आहे.

सीएनजी निर्मितीसाठी आवश्यक असलेल्या नैसर्गिक वायूच्या खरेदी खर्चात वाढ झाल्याने दरवाढ करणे आवश्यक ठरल्याचे एमएनजीएलने स्पष्ट केले. मात्र, या किरकोळ दरवाढीनंतरही पुण्यातील सध्याच्या दरपातळीनुसार प्रवासी कार विभागात पेट्रोलच्या तुलनेत सुमारे ४८ टक्के आणि डिझेलच्या तुलनेत २६ टक्के बचत सीएनजीमुळे होत असल्याचा दावा कंपनीने केला आहे. तसेच, ऑटोरिक्षांसाठीही डिझेलच्या तुलनेत सुमारे २६ टक्के बचत होत असल्याचे सांगण्यात आले.

दरम्यान, घरगुती वापरासाठीच्या पाइप्ड नॅचरल गॅसच्या दरात कोणतीही वाढ करण्यात आलेली नसल्याचे एमएनजीएलने स्पष्ट केले आहे. ग्राहकांनी सुधारित दराची नोंद घ्यावी, असे आवाहनही प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news