MIT University Fraud: एमआयटी विद्यापीठाची अडीच कोटींची फसवणूक; माजी कुलगुरुंच्या नावाचा वापर

आयआयटी मुंबईच्या प्राध्यापकाच्या नावे घातला गंडा
MIT University Fraud
एमआयटी विद्यापीठाची अडीच कोटींची फसवणूक; माजी कुलगुरुंच्या नावाचा वापर Pudhari
Published on
Updated on

पुणे: सायबर चोरट्यांनी एमआयटी विद्यापीठाला तब्बल दोन कोटी 46 लाख रुपयांचा आर्थिक गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. रिसर्च फंडिंग अपॉर्च्युनिटी प्रोजेक्टसाठी शासनाने मंजूर केलेल्या रक्कमेच्या दोन टक्के रक्कम भरायची असल्याचे सांगून माजी कुलगुरू यांच्या नावाचा वापर करून आयआयटी मुंबईच्या प्राध्यापकांच्या नावाने ही फसवणूक केली आहे.

याबाबत एमआयटी विश्वशांती विद्यापीठाचे शैक्षणिक अधिकारी डॉ. प्रसाद दत्तकुमार खांडेकर यांनी शिवाजीनगरमधील सायबर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार 25 जुलै ते 26 ऑगस्ट 2025 दरम्यान घडला आहे. (Latest Pune News)

MIT University Fraud
Child Assault Case: चिमुकलीवर अत्याचार करणाऱ्या सावत्र बापास मरेपर्यंत जन्मठेप

फिर्यादी हे एमआयटी विश्वशांती विद्यापीठात शैक्षणिक अधिकारी म्हणून काम पाहतात. त्यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू रघुनाथ शेवगावकर यांच्या नावाने एक मेसेज आला. डॉ. शेवगावकर हे आयआयटी मुंबईचे प्राध्यापक म्हणून काम पाहत होते. 25 जुलै रोजी त्यांच्या मोबाईलवरून मेसेज आला की, रिसर्च फंडिंग अपॉर्च्युनिटी प्रोजेक्ट करीता डॉ. चेथन कामथ ही व्यक्ती संपर्क करेल. त्या मेसेजमध्ये कामथ यांचा मोबाईल नंबरही दिला होता.

त्यानंतर त्या नंबरवरून चेथन कामथ यांचा फोन आला. त्यांनी ते आयआयटी मुंबईचे प्राध्यापक असून आयआयटी मुंबई विद्यापीठासोबत एकत्रितपणे संशोधन प्रकल्पावर काम करण्याबाबत सुचविले. तसेच त्यांनी डीएसटी/ डीआरडीओचा ड्रोनचा प्रकल्प करण्यासाठी शासनाकडून एकूण 28 कोटी रुपये खर्च मंजूर झाल्याचे सांगितले.

मात्र, संबंधित प्रकल्पामध्ये सहभागी होण्यासाठी विद्यापीठाला एकूण मंजूर खर्चाच्या दोन टक्के म्हणजे 56 लाख रुपये पुढील तीन तासात भरावे लागतील, असे सांगितले. तेव्हा फिर्यादींनी एमआयटी विद्यापीठाचे डीन रिसर्च डॉ. भरत काळे यांच्याशी त्यांनी प्रकल्पाबाबत विचार विनिमय केला. अशा प्रकारचे प्रकल्प असल्याबाबत त्यांनी फिर्यादींना माहिती दिल्याने डॉ. चेथन कामथ याने सांगितलेल्या प्रकल्पाबाबतची खात्री पटली.

हा प्रकल्प विद्यापीठास फायदेशीर असल्याने फिर्यादी पैसे पाठविण्यास तयार झाले. सुरुवातीला 56 लाख रुपये जमा केली. काही दिवसांनंतर डॉ. चेथन कामथ याने पुन्हा संपर्क साधून आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा शासनाचा 23 कोटींचा प्रकल्प मंजूर झाला असून त्यासाठी 46 लाख रुपये विद्यापीठाकडून भरण्यास सांगितले.

MIT University Fraud
Baramati Crime: बाप-लेकाने केला तरुणाचा खून; पारवडीतील घटना

त्यानंतर पुन्हा मशीन लर्निंग हा 72 कोटी रुपयांचा शासन प्रकल्प मंजूर त्यासाठी एक कोटी 44 लाख रुपये भरण्याबाबत सांगितले. त्यानुसार त्यांनी ते भरले. तीन टप्प्यात विद्यापीठाकडून दोन कोटी 46 लाख रुपये डॉ. चेथन कामथ याने सांगितल्याप्रमाणे भरण्यात आले.

फसवणूक झाल्याचे असे आले लक्षात

पैसे पाठविल्यानंतर या प्रकल्पाबाबत सामंजस्य करार करण्यासाठी कामथ यांना 28 ऑगस्ट रोजी एमआयटी विद्यापीठामध्ये येण्यास सांगितले. त्याला ते तयार झाले. परंतु, 26 ऑगस्टपासून त्यांचा संपर्क होत नव्हता. त्यामुळे डॉ. खांडेकर यांनी आयआयटी मुंबईत संपर्क साधून चेथन कामथ यांचा नंबर घेतला.

त्यांच्याशी संपर्क साधल्यावर त्यांनी कोणत्याही प्रकल्पाबाबत कोणाशीही चर्चा केली नसल्याचे कामथ यांनी खांडेकर यांना सांगितले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी कुलसचिव गणेश पोकळे यांच्याशी संपर्क साधून याची माहिती दिली. त्यानुसार सायबर पोलिस ठाण्यात 28 ऑगस्ट 2025 रोजी तक्रार अर्ज देण्यात आला होता. त्यानंतर तब्बल नऊ दिवसांनी सायबर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलिस निरीक्षक स्वप्नाली शिंदे तपास करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news