

पुढारी ऑनलाईन डेस्क : राज्य मंत्रिमंडळाची पहिली कॅबिनेट आज (दि.२) पार पडली. या कॅबिनेटला क्रीडा व अल्पसंख्यांक विकास विभागाचे कॅबिनेट मंत्री दत्तात्रय भरणे (Dattatray Bharne) मात्र अनुपस्थित राहिले. खातं वाटपावरून दत्तात्रय भरणे नाराज असल्याच्या चर्चा होत्या. यावर त्यांनी स्पष्टीकरण ही दिले आहे. मात्र, आज पहिल्याच कॅबिनेटला भरणे यांनी दांडी मारल्याने राजकारणात पुन्हा भुवया उंचावल्या आहेत.
मात्र, भरणे यांनी दांडी का मारली याचे कारण तुम्हालाही आश्चर्यकारक वाटणार आहे. अत्यंत जवळच्या कार्यकर्त्याच्या घरातील विवाह सोहळा पार पडतोय आणि या कार्यकर्त्याला जपण्यासाठी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी पहिल्याच कॅबिनेटला दांडी मारली. कॅबिनेटचा निरोप आपल्याला रात्री उशिरा आला. पुढील आठवड्यात मी खात्याचा पदभार स्वीकारणार आहे. त्यावेळी जाणारच आहे.कॅबिनेट जितकी महत्त्वाची तितकीच कार्यकर्ता देखील मला महत्त्वाचा असल्याचे भरणे यांनी म्हटले आहे.