

यू-ट्यूब चॅनेलवरील तरुणाईचे व्हिडीओ म्हणजेच व्लॉग्स फेमस आहेतच... अनेक तरुण - तरुणी व्लॉगिंगकडेही वळले आहेत. पण, आता तरुणाईमध्ये 30 ते एक मिनिटांच्या मिनी व्लॉग्सचीही (शॉर्ट व्हिडिओ) क्रेझ वाढली आहे. रोजचा दिनक्रम असो वा भटकंती... एखादी कला असो वा सामाजिक विषय...आदी विषयांवर मिनी व्लॉग्स तयार करण्यात येत असून, सध्या इन्स्टाग्रामवर अशा व्लॉग्सची धूम आहे. 20 ते 35 वयोगटातील तरुण व्लॉग्स तयार करत आहेत आणि सोशल मीडियावर त्यांच्या व्लॉग्सला पसंती मिळत आहे, चांगले व्ह्यूज मिळत आहेत. पंधरा ते वीस मिनिटांचे व्लॉग्स पाहण्यापेक्षा आता मिनी व्लॉग्स पाहण्याकडेही तरुणांचा कल वाढला आहे. तसेच, असे व्लॉग्स करणार्यांची संख्याही वाढली आह
सध्या दहा ते पंधरा व्लॉग्स यू - ट्यूबवर पाहायला मिळत आहेतच. त्यात वेगवेगळे विषय मांडले जात आहेतच. पण, दिवसभरात व्हिडिओ शूट करून ते एडिट करून मिनी व्लॉग्स तयार करण्यात येत आहेत आणि हे व्लॉग्स इन्स्टाग्रामवर आणि यू - ट्यूब चॅनेलवर व्हायरल होत आहेत. महाविद्यालयीन तरुण असो वा आयटीतील नोकरदार तरुण असे 30 सेकंद ते 1 मिनिटांचे मिनी व्लॉग्स तयार करत आहेत आणि पर्यटनावरील व्लॉग्सला सर्वाधिक व्ह्यूज मिळत आहेत. काहींची प्रायोजकत्व, जाहिराती आणि मिळणार्या व्ह्यूज चांगली कमाई होत आहे. दैनंदिन घडामोडींच्या व्लॉग्सही पसंती मिळत आहे. अनेकांसाठी हे माध्यम करिअरचा पर्याय बनले आहे.
याविषयी मिनी व्लॉग्स तयार करणारे गणेश निमकर म्हणाले, मी यू - ट्यूब चॅनेलवर दहा ते पंधरा मिनिटांचे व्लॉग्स तयार करतोच. आता मी मिनी व्लॉग्सकडे वळलो आहे. मी पर्यटनावर आधारित व्लॉग्स तयार करतो. नवनवीन ठिकाणी पर्यटनाला जाऊन त्यावर आधारित माहितीपर व्लॉग्स मी तयार करतो, त्याला चांगले व्ह्यूजही मिळत आहे, इन्स्टाग्रामवर या व्लॉग्सला पसंती मिळत आहे. मी पहिले व्हिडिओ शूट करतो, त्यानंतर त्याचे एडिटिंग करून त्याला मिनी व्लॉग्सचे स्वरूप देतो आणि ते इन्स्टाग्रामवर अपलोड करतो. आज लोकांना मोठे व्हिडिओ पाहण्यासाठी वेळ नसतो. त्यामुळे छोटे व्हिडिओ पाहण्याकडे कल वाढला आहे. त्यामुळे आताच्या घडीला रिल्स सारखेच मिनी व्लॉग्स तयार करत आहेत.