पुरंदरला दूध अनुदान रक्कम कागदावरच ?

ऑगस्ट, सप्टेंबरच्या दूध अनुदानाकडे शेतकर्‍यांचे डोळे
milk
दूध व्यवसाय Pudhari File Photo
Published on
Updated on

राज्यातील दूध उत्पादक शेतकर्‍यांना खासगी व सहकारी दूध संघ 30 रुपये प्रतिलिटर दर व राज्य सरकार पाच रुपये अनुदान असे एकूण प्रतिलिटर 35 रुपये दराची घोषणा शासनाकडून जून महिन्यात करण्यात आली होती. मात्र, ऑक्टोबर सुरू होऊन आठवडा उलटला तरी अद्यापपर्यंत 1 जुलैपासूनचे प्रतिलिटर पाच रुपये अनुदान खासगी दूध संघाकडून दूध उत्पादक शेतकर्‍यांना मिळालेले नाही. त्यामुळे हे अनुदान कागदावरच राहिले की काय, असा सवाल शेतकर्‍यांकडून उपस्थित केला जात आहे.

राज्य शासनाच्या घोषणेनंतर काही सहकारी दूध उत्पादक संघाकडून सभासद दूध उत्पादक शेतकर्‍यांच्या बँक खात्यात जुलै महिन्यातील अनुदान रक्कम वर्ग करण्यात आली. मात्र, ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यांतील अनुदान मिळालेले नाही. त्यामुळे आगामी दसरा, दिवाळी साजरी करताना आर्थिक चणचण जाणवणार असल्याचे दूध उत्पादक शेतकर्‍यांकडून सांगण्यात येत आहे.

दूध उत्पादक शेतकर्‍यांना जुलै ते सप्टेंबर महिन्यांपर्यंत प्रतिलिटर 30 रुपये दर मिळत आहे. पशू खाद्यांच्या वाढलेल्या दरामुळे दुग्धव्यवसाय परवडत नाही. सहकारी दूध संघाला दूध पुरवठा करणार्‍या शेतकर्‍याला अजून अनुदानाच्या रकमेची प्रतीक्षाच असून, यामुळे त्यांच्यात प्रचंड नाराजी पसरली आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news