MHADA Housing: हक्काच्या घराचं स्वप्न होणार पूर्ण..! जिल्ह्यात तब्बल 13 हजार 301 घरे बांधण्याचे म्हाडाचे नियोजन

पुणे आणि पिंपरी-चिंचवड सारख्या शहरी भागांसोबतच आता पुणे जिल्ह्याच्या निमशहरी भागातही परवडणारी घरे उपलब्ध करून देण्यासाठी म्हाडा पुढे सरसावले आहे.
MHADA Housing
हक्काच्या घराचं स्वप्न होणार पूर्ण..! पुणे जिल्ह्यात तब्बल 13 हजार 301 घरे बांधण्याचे म्हाडाचे नियोजन Pudhari
Published on
Updated on

पुणे: केंद्र सरकारच्या पंतप्रधान आवास योजनेंतर्गत पुणे जिल्ह्यात सुमारे 35 हजार घरांचे उद्दिष्ट आहे. यापैकी तब्बल 13 हजार 301 घरे बांधण्याचे नियोजन म्हाडाकडून करण्यात आले आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवड सारख्या शहरी भागांसोबतच आता पुणे जिल्ह्याच्या निमशहरी भागातही परवडणारी घरे उपलब्ध करून देण्यासाठी म्हाडा पुढे सरसावले आहे.

मुळशी तालुक्यातील नेरे येथे गट क्रमांक 117 आणि 118 मधील एकूण साडेसात हेक्टरपेक्षा जास्त जमीन देण्यात आली आहे. मात्र, या जागेबाबत ग्रामपंचायतीकडून आक्षेप नोंदविला गेला असून, त्यावर निर्णय प्रक्रियेचे पडसाद उमटत आहेत. (Latest Pune News)

MHADA Housing
राष्ट्रीय पोषण सप्ताह: लठ्ठ मुलांना प्रौढावस्थेत गंभीर आरोग्य समस्यांचा धोका

खेड तालुक्यातील रोहकल आणि मुळशी तालुक्यातील नेरे या ठिकाणांवरील सुमारे 57 एकर सरकारी गायरान जमीन जिल्हा प्रशासनाने म्हाडाकडे सुपूर्त केली आहे. या जमिनीवरच गृहनिर्माण प्रकल्प उभारले जाणार आहेत.

रोहकलमधील गट क्रमांक 220 मधील 15 हेक्टर 76 गुंठे सरकारी जमीन तसेच जिल्हा परिषदेच्या नाहरकत (एनओसी) नंतर दिलेली 15 हेक्टर 46 गुंठे जमीन म्हाडाच्या ताब्यात आली आहे. आता या प्रकल्पासाठी प्रशासकीय मान्यता घेण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. त्यानंतर तांत्रिक मान्यता आणि निविदा प्रक्रिया राबविली जाईल.

MHADA Housing
Maratha Reservation: माईकवर चर्चा होते का? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मनोज जरांगे यांना सवाल

पुणे विभागातील सभापती शिवाजीराव आढळराव यांनी सांगितले की, रोहकल आणि नेरे येथील प्रकल्पांतून साधारण 13 हजार घरांची निर्मिती होईल. त्यातील काही घरे गरीब आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी राखीव राहतील. जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनीही सांगितले की, पीएमवाय अंतर्गत या जागांवर टप्प्याटप्प्याने प्रकल्प राबवून गरिबांना परवडणारी घरे उपलब्ध करणे शक्य होईल.

रोहकलमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून आदिवासी समाजाचे वास्तव्य आहे. या समाजासाठी काही भाग राखीव ठेवण्याची विनंती पालकमंत्री अजित पवार यांच्याकडे करण्यात आली होती. त्यामुळे प्रकल्पात त्यांच्या पुनर्वसनासाठी जागा राखीव ठेवली जाणार आहे. उर्वरित जमिनीत ’म्हाडा’ गृहनिर्माण प्रकल्प राबवणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news