Methanol Poisonous Liquor Case: मिथेनॉल विकणाऱ्या पिता-पुत्रांना बेड्या; चार दिवसांची पोलिस कोठडी

अरुण जगदंब चौबे (वय 59) आणि अभिषेक अरुण चौबे (24, दोघे रा. वाशीगाव, नवी मुंबई) अशी दोन आरोपींची नावे आहेत.
Jail
JailPudhari
Published on
Updated on

पुणे: दापोडी आणि हडपसर परिसरात मिथेनॉल मिश्रीत विषारी हातभट्टीची दारू प्यायल्याने झालेल्या मृत्यू प्रकरणात गुन्हे अन्वेषण विभागाने (सीआयडी) कारवाई करत मुंबई येथून दोघा पिता-पुत्रांना बेड्या ठोकल्या.

रेक्स इंटरनॅशनल या मिथेनॉल विक्री करणाऱ्या कंपनीशी हो दोघे संबंधित आहेत. अरुण जगदंब चौबे (वय 59) आणि अभिषेक अरुण चौबे (24, दोघे रा. वाशीगाव, नवी मुंबई) अशी दोन आरोपींची नावे आहेत.

Jail
Pune Politicis: विधान परिषदेत ‌‘अजितदादा‌’ गटाचा धमाका; राजकीय नाट्यानंतर विक्रम काकडे बिनविरोध

त्यांना न्यायालयाने चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. दारू कांडातील मुख्य आरोपी योगेश व्हानकडे ऊर्फ सिकंदर राठोडने ऑनलाइन संकेतस्थळाच्या माध्यमातून चौबेच्या कंपनीतून मिथेनॉल खरेदी केले होते.

दापोडी पोलिस ठाणे आणि हडपसर पोलिस ठाण्याच्या हद्दीत 26 ते 28 मे 2026 या कालावधीत विषारी हातभट्टीची दारू पिल्याने 26 नागरिकांचा मृत्यू झाला. यामध्ये पोलिसांच्या माहितीनुसार आकडा वेगळा आहे.

Jail
Internation Agri Market: पालघरमधील दापचरी येथे उभारणार आंतरराष्ट्रीय दर्जाचा कृषी बाजार; जयकुमार रावल यांची माहिती

तर कुटुंबीयांनी केलेल्या दाव्यानुसार आकडा वेगळा आहे. या प्रकरणी दापोडी पोलिस ठाण्यासह हडपसर पोलिस ठाण्यातही भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांसह महाराष्ट्र दारूबंदी कायद्यांतर्गत गुन्हा नोंद केला आहे.

तपासादरम्यान विषारी रासायनिक पदार्थांची साखळी उलगडत सीआयडीने अरुण चौबे आणि अभिषेक चौबे या बाप- लेकाला ताब्यात घेतले.

या तपासादरम्यान सीसीटीव्ही फुटेज, मोबाईल कॉल रेकॉर्ड आणि इतर तांत्रिक पुरावे जप्त केले असून ते न्यायवैज्ञानिक प्रयोगशाळेकडे (एफएसएल) विश्लेषणासाठी पाठवल्याची माहिती देखील सीआयडीने दिली.

ही कारवाई सीआयडीचे अपर पोलिस महासंचालक सुनील रामानंद, विशेष पोलिस महानिरीक्षक सुधीर हिरेमठ, पोलिस अधीक्षक शफकत आमना यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या प्रकरणाचा तपास सीआयडीचे उपअधिक्षक शामराव काळे आणि सचिन चव्हाण हे करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news