Weather Update: राज्यात थंडी पुन्हा परतणार; किमान तापमान 9 ते 10 अंशांखाली जाईल

आगामी आठवड्यात पारा दहा अंशांखाली जाईल
Weather Update
राज्यात थंडी पुन्हा परतणार; किमान तापमान 9 ते 10 अंशांखाली जाईलPudhari News network
Published on
Updated on

पुणे: आगामी आठवड्यात राज्यातील बहुतांश शहरांचे किमान तापमान 9 ते 10 अंशांखाली जाईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. मंगळवारी अहिल्यानगर येथे राज्यातील सर्वांत कमी 10.5 अंश सेल्सिअस इतके तापमान नोंदले गेले.

थंडी हळुवार पावलांनी राज्यात सक्रिय होत असून, आगामी आठवड्यात पारा दहा अंशांखाली जाईल, असा अंदाज आहे. त्याची सुरुवात गत चोवीस तासांपासून झाली असून, मंगळवारी अहिल्यानगर, पुणे, जळगाव, नाशिक, नागपूर, यवतमाळ येथील पारा 10 ते 12 अंशांवर खाली आला होता. उत्तर भारतातील शीतलहरी विदर्भमार्गे राज्यात येण्यास सुरुवात झाली असून, जानेवारीचा शेवटचा आठवडा थंडीचा राहील, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

मंगळवारचे किमान तापमान

अहिल्यानगर 10.5, पुणे 12.7, जळगाव 12.7, कोल्हापूर 18.3, महाबळेश्वर 14.6, मालेगाव 13.4, नाशिक 12.3, सांगली 16.4, सातारा 14.2, सोलापूर 15.9, धाराशिव 13.4, छ. संभाजीनगर 13.1, परभणी 12.4, बीड 15.2, अकोला 13.7, अमरावती 13.9, यवतमाळ 12.2, मुंबई 21.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news