Medical admission list : वैद्यकीय प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी 13 ऑगस्टला प्रसिद्ध होणार

अभ्यासक्रमासाठी सुमारे 64 हजार विद्यार्थ्यांची नोंदणी
Medical admission
वैद्यकीय प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी 13 ऑगस्टला प्रसिद्ध होणारMedical admission list
Published on
Updated on

पुणे : राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाच्या वैद्यकीय समुपदेशन समितीने वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या वेळापत्रकामध्ये बदल केल्यामुळे राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्ष अर्थात सीईटी सेलकडून वैद्यकीय व दंत अभ्यासक्रमाच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. त्यानुसार महाविद्यालयांचा पसंतीक्रम भरण्यासाठी 8 ऑगस्टपासून सुरुवात करण्यात आली आहे. पहिली अंतिम गुणवत्ता यादी 13 ऑगस्ट रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी जवळपास 64 हजार विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे.

6 ऑगस्ट रोजी सीईटी कक्षाने अंतरिम गुणवत्ता यादी जाहीर करून जागांचा तपशीलही जाहीर केला. परंतु महाविद्यालयाचा पसंतीक्रम भरण्यासाठीच्या मुदतीमध्ये एमसीसीने बदल केल्याने सीईटी सेलकडून त्यात बदल करण्यात आला आहे. त्यामुळे नव्या वेळापत्रकानुसार वैद्यकीय व दंत अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्यांना 8 ते 11 ऑगस्ट या कालावधीत महाविद्यालयांचा पसंतीक्रम भरता येणार आहे. पहिली गुणवत्ता यादी 13 ऑगस्टला जाहीर करण्यात येणार आहे. 14 ते 22 ऑगस्ट रोजी सायंकाळी 5.30पर्यंत विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष महाविद्यालयात जाऊन प्रवेश घ्यायचा आहे.

नीट यूजी परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर तब्बल एक महिन्याने वैद्यकीय समुपदेशन समितीने अखिल भारतीय कोट्याचे वेळापत्रक जाहीर केले. त्याचवेळी राज्य कोट्यातील प्रवेशप्रक्रिया राबविण्यांसदर्भातही सूचना देण्यात आल्या. त्यानुसार राज्य कोट्याअंतर्गत एमबीबीएस, बीडीएस, बीएएमएस, बीएचएमएस, बीयूएमएस, बीएनवायएस, बीपीटीएच, बीओटीएच, बीएएसएलपी या अभ्यासक्रमासाठी नोंदणी प्रक्रिया सुरू केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news