

पुणे : महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या सदस्यपदी संभाजीराजे आणि अपूर्वा सामंत यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. या निवडीमुळे महाराष्ट्रातील क्रिकेट प्रशासनाला नवे नेतृत्व व दिशा मिळेल, अशी आशा क्रिकेट वर्तुळातून व्यक्त केली जात आहे.
माजी खासदार संभाजीराजे सध्या कोल्हापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष आहेत. कोल्हापूर स्पोर्टस् असोसिएशन (केएसए) च्या माध्यमातून क्रीडा विकासासाठी ते सक्रीय आहेत. अपूर्वा सामंत या आमदार किरण सामंत यांच्या कन्या असून त्या उच्चशिक्षित व तरुण उद्योजक म्हणून परिचित आहेत. सामाजिक व उद्योजकीय क्षेत्रांतील त्यांचा सक्रिय सहभाग उल्लेखनीय ठरला आहे. त्यांच्या निवडीमुळे कोकणातील उदयोन्मुख युवक-युवतींसाठी नव्या संधींची दारे खुली होतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.