Pune Crime: फोटो व्हायरल करण्याची धमकी देत विवाहितेवर अत्याचार

भटजीला अटक; रवानगी थेट कारागृहात
crime news
फोटो व्हायरल करण्याची धमकी देत विवाहितेवर अत्याचारpudhari
Published on
Updated on

Pune Crime News: फेसबुकच्या माध्यमातून ओळख झालेल्या विवाहित महिलेसोबत धरणाच्या भिंतीवर एकत्रित काढलेले फोटो व्हायरल करण्याची धमकी देत वेळोवेळी महिलेवर अत्याचार करणार्‍या भटजीला ओतूर पोलिसांनी बेड्या ठोकल्या. त्याची रवानगी थेट येरवडा कारागृहात करण्यात आल्याची माहिती ओतूर पोलीस सूत्रांनी दिली.

शशांक जोशी (वय 38, रा. ओतूर, ता. जुन्नर) असे अटक करण्यात आलेल्या संशयित भटजीचे नाव असून पीडित महिलेने ओतूर पोलिसात स्वतः हजर राहून या भटजीविरुध्द तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार ओतूर पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत अधिक माहिती घेतली असता पीडित विवाहित महिला व संशयित शशांक जोशी यांची सन 2020 मध्ये फेसबुक अकाउंटमार्फत ओळख झाली. त्यानंतर जोशी हा पीडितेस सतत फोन करू लागला. एकदा पीडित महिला व जोशी हे खुबी (ता. जुन्नर) येथील खिरेश्वरकडे जाणार्‍या रस्त्यावरील धरणाच्या बंधार्‍यावर असताना त्याने दोघांचे एकत्र फोटो काढले. त्यानंतर जोशी याने वेळोवेळी आपल्या दोघांचे एकत्र काढलेले फोटो तुझ्या नवर्‍याला दाखवेल, अशी धमकी देऊन फोन करून भेटण्यास बोलवत असे.

सन 2020 डिसेंबरमध्ये दुपारच्या सुमारास पीडितेचे पती घरातून बाहेर गेल्याचे बघून आरोपीने जबरदस्तीने घरात घुसून दोघांचे एकत्रित फोटो व्हायरल करेल, अशी धमकी देऊन जोशीने फिर्यादीसोबत शरीरसंबंध ठेवले. तसेच त्याबद्दल कुणास काही सांगितले तर आपले फोटो व्हायरल करेल, तसेच माझ्या जिवाचे बरे-वाईट करून घेईल अशी धमकी दिली. यानंतर पुन्हा पुन्हा भेटायचे आहे, असे जोशी म्हणू लागल्याने त्यास पीडितेने नकार दिल्यामुळे आरोपीने फिर्यादीची आई, भाऊ, बहीण यांना देखील फोन करून त्रास दिला.

तसेच त्याचा मित्र तसेच पीडितेच्या पतीचे मित्र यांना देखील त्याने दोघांचे एकत्रित काढलेले फोटो पाठवले. अखेर या पीडित महिलेची सहनशीलता संपुष्टात आल्याने तिने सरळ पोलिसात तक्रार नोंदवून भटजीला जेलची हवा खायला पाठवल्याची चर्चा ओतूर गावात सुरू आहे. या प्रकरणाचा तपास ओतूरचे सहायक पोलिस निरीक्षक लहू थाटे यांचे मार्गदर्शनात सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news