Pune : कर्नाटकातील बस थांब्यावर मराठी बस चालकाला मारहाण झाल्याचे प्रकरण ताजे असतानाच पुण्यात कर्नाटकच्या बसना काळे फासले आहे. शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून लक्ष्मीनारायण पार्किंग येथे कर्नाटकच्या गाड्यांना काळे फासण्यात आले. या घटनेची माहिती अगोदरच मिळाल्यामुळे पोलिसांनी येथे कडेकोट बंदोबस्त लावला होता लावला होता. मात्र तरीही शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी घुसखोरी करत, कर्नाटक सरकारच्या गाड्यांना काळे फासले
सरकारने सीमा प्रश्न सोडवावा, सरकारचा धिक्कार असो, मराठी माणसावर अन्याय झालेला खपवून घेतला जाणार नाही, एसटी चालकाला झालेली मारहाण खपवून घेतली जाणार नाही, आम्हीही रस्त्यावर उतरू, असे यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी यावेळी सांगितले. यानंतर पोलिसांनी शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या आंदोलन कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. यावेळी कार्यकर्ते आक्रमक झाल्याने पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील पाटील घटनास्थळी दाखल झाल्या होत्या.
संबंधित बसचालक कर्नाटकात बस घेऊन गेला असता कानडी भाषा येत नसल्याच्याकारणावरून कानडी लोकांनी त्यांना मारहाण केल्याचे समोर येते आहे. याचा उद्रेक आज कर्नाटकच्या बसला काळे फासून व्यक्त करण्यात आला