

Pune: सरपंच संतोष देशमुख यांची हत्या क्रूरपणे केली. राज्य यांना कुठं न्यायचं आहे, याविरोधात राज्यभर आम्ही मराठे मोर्चे काढू. हा खून आमच्या जिव्हारी लागला आहे. आता मी थेट मुख्यमंत्र्यांना बोलणार आहे. आतापर्यंत मुख्यमंत्र्यांच्या शब्दावर मराठे शांत असल्याचे मराठा संघर्षयोद्धा मनोज जरांगे यांनी सांगितले.
संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूप्रकरणी रविवारी लाल महाल ते जिल्हाधिकारी कार्यालय असा जनआक्रोश मार्चा काढण्यात आला. यापूर्वी मनोज जरांगे माध्यमांशी बोलत होते.
मनोज जरांगे म्हणाले, मुख्यमंत्र्यांनी धनंजय मुंडे यांना आवरावं, नाहीतर आम्ही थांबणार नाही. आमची लोक अडकवतील, ज्या मराठ्यांनी वाचवलं, त्यावर तुम्ही पलटला आहात, प्रतिमोर्चे काढले तर आम्हीदेखील तसेच उत्तर देऊ, असा इशारा मनोज जरांगे यांनी धनंजय मुंडे यांना दिला.