

पुणे: अक्कलकोट येथे संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर केलेला हल्ला हा भ्याड हल्ला असून त्याचा जाहीर निषेध करतो. यामधील प्रमुख दीपक काटे याच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई करावी. तसेच राज्य सरकारने जन सुरक्षा विधेयकाचा पहिला आरोपी दिपकला करावे, अशी मागणी मराठा संघटनांच्या बैठकीमध्ये घेण्यात आला.
मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड आणि सर्व मराठा समाजाच्या संघटनांच्या वतीने संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावरील हल्ल्याच्या निषेधार्थ बैठक आयोजित करण्यात आली होती. (Latest Pune News)
या बैठकीला मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर, संभाजी ब्रिगेडचे केंदीय निरीक्षक विकास पासलकर, मराठा महासंघाचे अजय पाटील, माजी महापौर श्रीकांत शिरोळे, काँग्रेसचे अरविंद शिंदे, रविंद्र माळवदकर, इतिहास अभ्यासक श्रीमंत कोकाटे, गजानन थरकुडे, प्राची दुधाने, शिवसंग्रामचे तुषार काकडे, रेखा कोंडे, संभाजी ब्रिगेडचे प्रशांत धुमाळ, विराज तावरे, अजय भोसले, युवराज दिसले, पूजा झोळे, माजी महापौर प्रशांत जगताप, पैगंबर शेख, अनिकेत देशमाने, बाळासाहेब दाभेकर, संतोष शिंदे, संजय मोरे, सत्यशोधक चळवळीचे प्रतिमा परदेशी यांसह विविध संघटनांचे प्रतिनिधी व पदाधिकारी उपस्थित होते.
पुरुषोत्तम खेडेकर म्हणाले, काही दिवसापासून मराठा समाजातील संघटनांमधील वातावरण थोडे बिघडले आहे हे सत्य नाकारता येणार नाही. जे झाले ते सकारात्मक पद्धतीने लढले पाहिजे. सर्व संघटना एकत्र येऊन आता पुढे चालू. आपल्यात ही मानापमान सुरू झाले आहे नागपूरच्या रेशीम भागातून येत आहे हे लक्षात घ्यावे. त्यामुळे याबाबत एकत्र येऊन बैठकीत निर्णय घेऊ.
शिरोळे म्हणाले, हा हल्ला झालेला चुकीचाच आहे. त्यांनी वात लावली आता ती आपण विजवण्याचे काम करणार आहोत. त्यासाठी पुरुषोत्तम खेडेकर यांच्या नेतृत्वाखाली चर्चा करून पुढील भूमिका घेऊ.
प्रशांत जगताप म्हणाले, महायुती सरकारचा जाहीर निषेध करतो. दीपक काटे याने नाही तर भाजपाने हा हल्ला केला आहे. दीपक काटे याला सरकारचे पाठबळ मिळत आहे. संबंधित संघटनेवर जन सुरक्षा कायद्यांतर्गत पहिला गुन्हा दाखल करून संघटना बाद करावी. तुम्ही हे करणार नसेल तर मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री यांच्या गाड्या शहरात फिरू देणार नाही.
कोकाटे म्हणाले, व्यक्तींवर नाही तर विचारावर झालेला हल्ला आहे. राज्यकर्ते जे आपल्याला गृहीत धरतात त्यांना आपली ताकद दाखवून दिले पाहिजे. विधिमंडळात कोण बोलतोय याची वाट पाहतोय... फक्त कार्यकर्ते वापरून घ्यायचे हा उद्योग सुरू आहे.
पासलकर म्हणाले, संबंधित व्यक्ती शिव विचारांचा नाही परंतु ते वेगळे पणाने दाखवण्यात आले आहे. हा हल्ला सहज समजू नये सुरवात त्यांनी केली आता शेवट संभाजी ब्रिगेड करणार हे सरकरने लक्षात ठेवावे. आगामी काळात तुम्हाला तुमच्या भाषेत ठोकणार हे नक्की करणार आहोत.
माळवदकर म्हणाले, बहुजन समाजातील लोकांनाच एकमेका मध्ये वाद लावण्याचे प्रकार फडणवीस यांच्या कडून सुरू आहे. मात्र अशा प्रकारचे प्रकार यापुढे खपवून घेणार नाही. तेवढ्याच तोडीचे उत्तर आपण देऊ.
कोंडे म्हणाल्या, काटे प्रकरणात खुलासा करावा, प्रवीण दादा यांना पोलीस संरक्षण द्यावे. घाणेरडी पैदास वेळीच ठेचावी. त्याच बरोबर सोलापूरकर यांच्या बाबतीत अशी भूमिका घेतली गेली नाही त्यावेळी अशा गप्प का होते. त्यामुळे संबंधितांवर कडक कारवाई व्हावी.
काकडे म्हणाले, दोन्ही ठिकाणी सत्ता आहे याचा माज आला आहे, राज्यव्यापी आंदोलन करावे, प्रत्येक जिल्ह्यात आंदोलन करावे, त्याला मोक्का लागावा... एक दिवसाचे आंदोलन करून विजयी सभा ही इथेच घ्यावी.
अरविंद शिंदे म्हणाले, ज्याला ज्या भाषेत कळत त्याला त्या भाषेत सांगणार असू तर निषेध सभेला अर्थ आहे. त्याचा चेहरा काळा करणे क्रमप्राप्त आहे.
यावेळी अजय पाटील, बाळासाहेब आमराळे, संजय मोरे, संतोष शिंदे, प्रतिमा परदेशी, प्रदीप कणसे यांनीही मनोगत व्यक्त केले.