Manchar Onion Market: मंचर बाजार समितीत कांद्याची २१ हजार ८०० पिशव्यांची आवक; दरात घसरण

नवीन कांद्याची आवक वाढल्याने बाजारभावावर परिणाम; १० किलोला ४५१ रुपयांचा उच्चांकी दर
Onion
OnionPudhari
Published on: 
Updated on: 

मंचर: कृषी उत्पन्न बाजार समिती, मंचर येथे मंगळवारी (दि. ६) कांद्याची २१ हजार ८०० पिशव्यांची आवक झाली. दहा किलो कांद्यासाठी ४५१ रुपये बाजार भाव मिळाला. नवीन कांदा बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात दाखल झाल्याने कांद्याच्या बाजारभावात घसरण झाल्याची माहिती बाजार समितीचे सभापती नीलेश थोरात यांनी दिली.

Onion
Pimperkhed Leopard Sighting: पिंपरखेड-जांबूत परिसरात पुन्हा बिबट्यांची दहशत; भरदिवसा दर्शनाने नागरिकांमध्ये भीती

येथे कांद्याला प्रति १० किलो ४५१ रुपये असा उच्चांकी दर मिळाला. सुपर गोळे कांद्याला ४३० ते ४५१ रुपये, सुपर मुक्कल कांद्याला ३९० ते ४२५, सरासरी मध्यम कांदा क्र. दोनला ३६० ते ३८५, गोल्टी व गोल्टा कांदा क्र. चारला २३० ते ३२०, तर बदला व चिंगळी कांद्याला ७० ते २२० रुपये असा दर मिळाला. अपवादात्मक गोळे कांद्याला ४५० ते ४७० रुपये दर मिळाल्याची माहिती उपसभापती सचिन हरिभाऊ पानसरे यांनी दिली.

Onion
Chicken Mutton Price Hike: : गणेशोत्सवानंतर चिकन-मटणाचे दर कडाडले; चिकन २६०, मटण ८४० रुपये किलो

बंगळुरू, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातून नवीन कांद्याची आवक वाढल्याने बाजारभावावर परिणाम झाला आहे. आवक वाढल्यामुळे सध्या कांद्याच्या दरात घसरण झाली असली तरी गुणवत्तापूर्ण कांद्याला चांगला दर मिळत आहे.

नीलेश थोरात, सभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती मंचर.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news