मंचर: कृषी उत्पन्न बाजार समिती, मंचर येथे सोमवारी (दि. 19) शेतमालाची मोठी आवक झाली. घेवड्याला दहा किलोस नऊशे रुपये असा उच्चांकी बाजार भाव मिळाला. इतर शेतमालाला देखील चांगला भाव मिळत असल्याने आजूबाजूच्या पाच तालुक्यातील शेतकरी मंचर कृषी उत्पन्न बाजार समिती येथे शेतीमाल विक्रीसाठी घेऊन येत असल्याची माहिती बाजार समितीचे सभापती नीलेश (स्वामी) थोरात यांनी दिली. (Latest Pune News)
मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीत आंबेगांव, खेड, जुन्नर, पारनेर, शिरुर मधून मोठया प्रमाणावर शेतमालाची आवक होत असते. बाजार समितीत शेतक-यां समोर शेतमालाचे वजन केले जाते. तसेच मालाची काय भावात विक्री झाली याची माहिती एसएमएसव्दारे कळविली जाते. यामुळे शेतकरी आपला शेतमाल विक्रीसाठी घेऊन येतात असे सभापती थोरात यांनी सांगितले.
मंचर बाजार समितीत शेतमालाला चांगला भाव मिळत असल्याचे बाजार समितीचे प्रभारी सचिव सचिन बो-हाडे यांनी सांगितले. 10 किलोला मिळालेला बाजारभाव पुढीलप्रमाणे : कैरी - 250-450, काळावाल- 250-50, कारले - 300-500, गवार- 600, घेवडा- 480-900, चवळी - 250-450, ढोबळी मिरची - 300-550, भेंडी - 200-350, फरशी- 200-500, फ्ला’वर - 120-225, भुईमुग शेंगा - 400-600, दोडका- 280-500, मिरची - 100-550, तोंडली- 100-400, शेवगा- 350-575, लिंबु - 500-600.