Manchar Theft Arrest: मंचरमध्ये खत-औषध दुकान चोरीप्रकरणी दोन सराईत अटकेत

पेठ येथील दुकानफोड प्रकरणी 8 लाख 11 हजारांचा मुद्देमाल पोलिसांकडून जप्त
Manchar Theft Arrest
Manchar Theft ArrestPudhari
Published on
Updated on

मंचर: मंचर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील पेठ (ता. आंबेगाव) येथील खत व औषधाच्या दुकानात चोरी करणाऱ्या दोन सराईतांना मंचर पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून सुमारे 8 लाख 11 हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.

Manchar Theft Arrest
Mukhyamantri Solar Krushi Vahini Yojana: मुख्यमंत्री सौर कृषिवाहिनी योजना 2.0 ला स्कोच सुवर्ण पुरस्कार

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पेठ येथील किरण कैलास कुंदळे यांच्या सह्याद्री कृषी उद्योग या खत-औषध दुकानात गुरुवारी (दि.1) रात्री चोरट्यांनी चोरी केली. यात दुकानातील 3 लाख 11 हजार 205 रुपयांची खते, औषधे व बियाणे चोरून नेण्यात आली होती. याप्रकरणी मंचर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

Manchar Theft Arrest
Bhigwan Police Station: भिगवण पोलिस ठाण्याची नवी इमारत सज्ज; गेटअभावी मोकाट जनावरांचा सुळसुळाट

तपास सुरू असताना पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली की, चोरीचा माल कार (एमएच 15 डीएम -8127) मधून मंचर ते सुलतानपूर रोडवरील नवीन पुणे-नाशिक महामार्गावरील पुलाखाली विक्रीसाठी आणला जाणार आहे. पोलिसांनी घटनास्थळी छापा टाकत संतोष पोपट नलावडे (वय 34, रा. नानेकरवाडी, चाकण) व अमर संतोष नायक (वय 19, रा. खराबवाडी) या दोघांना ताब्यात घेतले.

Manchar Theft Arrest
Malegaon Nagarpanchayat: माळेगाव नगरपंचायतीत सत्तेची सारीपाट; उपनगराध्यक्ष निवडीची रंगत

पोलिसांनी आरोपींकडून सुमारे 5 लाख रुपये किंमतीची कार तसेच चोरीतील 3 लाख 11 हजार 205 रुपयांची खते, औषधे व बियाणे असा एकूण 8 लाख 11 हजार 205 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

Manchar Theft Arrest
Ashwini Pacharane: वाफगाव-रेटवडी गटात अश्विनीताई पाचारणे यांचा दबदबा

ही कारवाई पोलिस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल, अपर पोलिस अधीक्षक रमेश चोपडे व उपविभागीय पोलिस अधिकारी अमोल मांडवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक श्रीकांत कंकाळ, सहायक पोलिस निरीक्षक सुनील बडगुजर यांच्या पथकाने केल्याची माहिती हवालदार नंदकुमार आढारी यांनी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news