

पुणे: कायदेशीर घटस्फोट न घेता दुसरा विवाह करत पहिल्या पतीला ‘तू पैसे पाठविले नाही, तर तुझ्या कुटुंबाला जेलमध्ये पाठवेन. तुझ्यावर बलात्काराची केस करेन,’ अशी धमकी दिल्यानंतर पहिल्या पतीने आत्महत्या केली. याप्रकरणी पत्नीवर व तिच्या संशयित दुसर्या पतीवर चंदननगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
स्वाती सिडनी दोयायराजू (वय 32) आणि चेतन मोरे (वय 35, दोघेही रा. वडोदरा, गुजरात) अशी गुन्हा दाखल केलेल्या दोघांची नावे आहेत. याबाबत भावाच्या वतीने त्याची मोठी बहीण स्टॅन्ली लॉरेन्स दोरायराजू (वय 41, रा. सोमनाथनगर, वडगावशेरी) यांनी फिर्याद दिली. (Latest Pune News)
फिर्यादीचा भाऊ सिडनी लॉरेन्स दोरायराजू यांच्याशी स्वाती हिने घटस्फोट न घेता चेतन याच्याशी बेकायदेशीररीत्या दुसरे लग्न केले. तिने दुसर्या पतीशी संगनमत करून पहिल्या पतीकडून 15 लाख 18 हजारांची रक्कम घेऊन त्याची फसवणूक केली. त्यानंतर सिडनीने तिच्याकडे पैशाची मागणी केली. मात्र, तिने सिडनी यांना केस करण्याची धमकी दिला. या त्रासाला कंटाळून स्टॅन्ली यांच्या भावाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.