माळेगाव कारखाना निवडणूक : दोन्ही पवारांचे पॅनेल आमने-सामने येणार

युगेंद्र पवार यांच्याकडून तयारीला लागण्याच्या सूचना
malegav sugar factory
माळेगाव साखर कारखाना Pudhari
Published on
Updated on

बारामती : माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक राष्ट्रवादीचा शरदचंद्र पवार गट लढवणार की नाही, असा संभ—म खा. सुप्रिया सुळे यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे निर्माण झाला होता. परंतु, कारखाना निवडणुकीत पुन्हा एकदा काकांशी दोनहात करण्याची तयारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुतणे युगेंद्र पवार यांनी केली आहे. ’माळेगाव’च्या निवडणूक रिंगणात आम्ही उतरणार असल्याचे युगेंद्र पवार यांनी जाहीर केले आहे.

युगेंद्र पवार यांच्या भूमिकेमुळे विधानसभा निवडणुकीनंतर पुन्हा एकदा बारामतीत ‘काका विरुद्ध पुतण्या’ अशी लढत रंगणार असल्याचे चित्र तयार झाले आहे.

पत्रकारांशी बोलताना युगेंद्र पवार म्हणाले की, सहकारी साखर कारखान्याची निवडणूक ही पक्ष म्हणून लढवली जात नाही. माळेगाव सहकारी साखर कारखाना हा शरद पवारांचा कारखाना म्हणून देशात, राज्यात ओळखला जातो. शरद पवार या कारखान्याचे सभासद आहेत. शरद पवार यांनी या कारखान्याच्या भल्यासाठी आजवर अनेक निर्णय घेतले आहेत. माळेगाव कारखाना आणि तेथील संस्था या शरद पवार यांच्या प्रयत्नांतून उभ्या राहिलेल्या आहेत. या कारखान्याची निवडणूक लढविण्यासंदर्भात शेतकर्‍यांच्या मनात शंका आहेत. जर शेतकरी निवडणूक लढणार असतील, तर आम्ही त्यांच्या पाठीशी निश्चितपणे उभे राहणार आहोत. अजून कारखान्याची निवडणूक जाहीर होते आहे. गेल्या काही वर्षांत कारखान्याच्या निवडणुका पुढे ढकलल्या गेल्या होत्या. त्या पार्श्वभूमीवर कारखाना ज्या वेळेस निवडणुकीची तारीख निश्चित होईल, त्या वेळेस या विषयावर आपण निश्चित बोलू. मात्र, शेतकरी निवडणुकीसाठी तयार असतील, ते साथ देण्यास तयार असतील तर आम्ही पूर्ण ताकद त्या ठिकाणी लावणार आहोत.

सध्या माळेगाव कारखान्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विचाराचे संचालक मंडळ कार्यरत आहे. तालुक्यातील माळेगाव व सोमेश्वर ही दोन्ही साखर कारखाने व अन्य मोठ्या सहकारी संस्था अजित पवार यांच्या एकछत्री अमलाखाली आहेत. तेथे शरद पवार गटाला ते प्रवेश करू देतील का? हा प्रश्नच आहे.

तावरे गुरू-शिष्यांच्या भूमिकेकडे लक्ष

‘माळेगाव’बाबत सहकारातील ज्येष्ठ नेते चंद्रराव तावरे, माजी अध्यक्ष रंजनकुमार तावरे या गुरू-शिष्यांनीही अद्याप आपली भूमिका जाहीर केलेली नाही. परंतु, नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत महायुती म्हणून ही मंडळी अजित पवार यांच्यासोबत राहिलेली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news