

पुणे : राज्यात थंडीची लाट तीव्र झाली असून बहुतांश शहरांचा पारा १० अंशाखाली जाण्याच्या तयारीत आहे. शुक्रवारी जळगाव ९.५,नाशिक १०.९,पुणे १२.७ अंशावर खाली आले होते.
उत्तर भारतात पश्चिमी चक्रावात अधिक तीव्र झाल्यामुळे त्या भागातून शीतलहरी महाराष्ट्रात येत आहेत. सध्या वाऱ्याचा वेग मंदावल्याने गारठा किंचित कमी जाणवत असला तरी तापमान घसरतच आहे. शुक्रवारी राज्याच्या किमान तापमानात एक ते दिड अंशाने घट झाल्याचे दिसून आले.
जळगाव ९.५,नाशिक १०.९,गोंदिया १०.५,पुणे १२.७, महाबळेश्वर १२.९, परभणी १२.५, बीड ११, अकोला १३.५, अमरावती १२.३, वर्धा १२.८, वाशिम ११.६, नागपूर १२