Maharashtra Dripball Champion: धायरीच्या शिरपेचात मानाचा तुरा; प्रथमेश जाधवच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र राष्ट्रीय ड्रिपबॉल चॅम्पियन

मथुरातील पहिल्या राष्ट्रीय ड्रिपबॉल स्पर्धेत ऐतिहासिक विजय; पुण्याच्या प्रथमेशचा कर्णधार म्हणून पराक्रम
ड्रीपबॉल स्पर्धेतील विजय महाराष्ट्र संघ
ड्रीपबॉल स्पर्धेतील विजय महाराष्ट्र संघPudhari
Published on
Updated on

खडकवासला: उत्तर प्रदेशातील मथुरा येथे पार पडलेल्या पहिल्या राष्ट्रीय ड्रिपबॉल अजिंक्यपद स्पर्धेत महाराष्ट्र राज्याने ऐतिहासिक विजय मिळवत विजेतेपद पटकावले आहे. ड्रिपबॉल संघाचे नेतृत्व पुण्याच्या धायरी भागातील एका सर्वसामान्य कुटुंबातील तरुण, कु. प्रथमेश प्रशांत जाधव याने केले, ज्यामुळे धायरीच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.

ड्रीपबॉल स्पर्धेतील विजय महाराष्ट्र संघ
Mahavitaran New Electricity Connection: नवीन वीज कनेक्शन आता ठरलेल्या कालमर्यादेतच

मथुरा येथील ''रिअल इंटरनॅशनल स्कूल''च्या मैदानावर ही स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत देशभरातील १० राज्यांच्या संघांनी आपला सहभाग नोंदवला होता. बास्केटबॉल, नेटबॉल आणि व्हॉलीबॉल या खेळांचे मिश्रण असलेल्या या नाविन्यपूर्ण ''ड्रिपबॉल'' खेळात महाराष्ट्राच्या संघाने सुरुवातीपासूनच आपले वर्चस्व राखले आणि अंतिम फेरीत विजय मिळवून ''नॅशनल चॅम्पियन'' होण्याचा मान मिळवला.

ड्रीपबॉल स्पर्धेतील विजय महाराष्ट्र संघ
Dahanu Tourism: विकसित भारताच्या वाटेवर डहाणू : पर्यटनातून ग्रामीण समृद्धीकडे

यावेळी ड्रिपबॉल इंडियाचे राष्ट्रीय महासचिव डॉ. अरविंद चित्तौडिया यांनी खेळाडूंचे कौतुक करताना सांगितले की, "ड्रिपबॉल हा केवळ एक खेळ नसून तो युवकांसाठी एक उत्तम व्यासपीठ आहे. लवकरच या खेळाचा समावेश शालेय क्रीडा स्पर्धांमध्ये केला जाईल." तसेच, जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात दक्षिण आशियाई चॅम्पियनशिपचे आयोजन केले जाणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले.

ड्रीपबॉल स्पर्धेतील विजय महाराष्ट्र संघ
Palghar Tourism: पालघर : इतिहास, निसर्ग आणि सागर सौंदर्याचा अद्भुत संगम

एका सर्वसामान्य कुटुंबातून जिद्दीच्या जोरावर भारतीय संघाचा कर्णधार बनलेल्या प्रथमेश जाधवचे सर्वत्र कौतुक होत आहे. त्याच्या या यशामुळे स्थानिक खेळाडूंना मोठी प्रेरणा मिळाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news