Mansoon update | मान्सून सक्रिय : कोकण, मध्य महाराष्ट्राला मुसळधारेचा इशारा!

पुण्यात २३ जूनपर्यंत येण्याची शक्यता, रविवारी बहुतांश भागात मान्सूनपूर्व सरी
Mansoon update | मान्सून सक्रिय : कोकण, मध्य महाराष्ट्राला मुसळधारेचा इशारा!
Published on
Updated on

पुणे : तब्बल १६ दिवस अडखळलेला पाऊस रविवारी (दि. २० जून) सक्रिय झाला. रविवारी राज्यातील बहुतांश भागात हलका ते मध्यम पावसाने हजेरी लावली. त्यामुळे २२ ते २७ जूनदरम्यान कोकण, मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. बारामती-सोलापूरजवळ अडखळलेला मान्सून २३ जून रोजी पुण्यात येण्याची शक्यता आहे.

राज्यात ५ जून रोजी मान्सून सिंधुदुर्ग जिल्ह्यात दाखल झाला. नंतर ६ ते ७ जूनदरम्यान प्रगती करीत सोलापूर, हरणाई ते बारामती मार्गावर आला. मात्र, ६ ते २१ जून अशी १५ ते १६ दिवस पावसाने दडी मारली होती. यादरम्यान नागरिकांना असह्य उकाड्याने हैराण केले होते. अखेर २० जून रोजी राज्यात मान्सून सक्रिय झाला. रविवारी पुणे शहर परिसर आणि राज्यातील काही भागांत मान्सूनपूर्व सरी बरसल्या.

मराठवाड्यात मध्यम, विदर्भात उष्णतेची लाट

हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, मान्सून सोलापूर भागातून १५ दिवसांनंतर प्रस्थान करीत २३ जूनदरम्यान पुण्यात येत आहे. तो जोरदार सक्रिय होणार असल्याने २२ ते २७ जून दरम्यान कोकण, मध्य महाराष्ट्रात मुसळधार; तर मराठवाड्यात मध्यम पावसाचा अंदाज आहे. विदर्भात मात्र २५ जूनपर्यंत उष्णतेची लाट राहणार आहे. त्या भागात २६ ते १ जुलैदरम्यान पावसाची शक्यता आहे.

पुणे शहरात जोरदार सरी

पुणे शहर परिसरातील काही भागांत रविवारी मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली. काही भागांत पाऊस, तर काही भाग कोरडा, असे वातावरण होते. पर्वती, कात्रज भागात जोरदार पावसाने बहार आणली.

(नकाशाः ओळः सोलापूर, हरणाई, बारामती भागात १५ दिवसांपासून अडखळलेला मान्सून २० जून रोजी सक्रिय झाला. २३ जून रोजी मान्सनचे पुण्यात आगमन होण्याची शक्यता आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news