बारामतीतून महाराष्ट्र केसरीसाठी पै. मदने, डोंबाळे यांची निवड

महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेसाठी आयोजित निवड चाचणी स्पर्धा
Maharashtra kesari kusti spardha
महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धाPudhari
Published on
Updated on

जिल्हा कुस्तीगीर तालीम संघ, पुणे व बारामती तालुका कुस्तीगीर संघ, बारामती यांच्या मान्यतेने महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेसाठी आयोजित निवड चाचणी स्पर्धेतून माती विभागात पै. भारत मदने तर गादी विभागाकडून पै. सोमनाथ डोंबाळे यांची महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली.

येथील कुस्ती केंद्रात ही चाचणी स्पर्धा पार पडली. स्पर्धेचे उद्घाटन संघाचे उपाध्यक्ष उत्कर्ष काळे, सचिव महेश देवकाते, खजिनदार दिलीप काटे, पोपट गावडे, वस्ताद सुधाकर माने, संतोष टाटीया, चंद्रकांत चव्हाण, धैर्यशील काळे, ऋषि गावडे, अमोल पवार, नीलेश जगदाळे, अजित शेलार आदींच्या हस्ते झाले. बाल वजन गटात 25 ते 60 किलोचे दहा गट करण्यात आले होते. वरिष्ठ वजन गटात माती व गादी विभागात 57 ते 97 असे नऊ गट, तर महाराष्ट्र केसरी किताब गट हा 86 ते 125 किलो वजन गटासाठी होता. बाल गटाची कुस्ती स्पर्धा पुणे जिल्हा स्तरापर्यंत झाली. स्पर्धेचे आयोजन रुई येथील भैरवनाथ तालीम संघाच्या नवनाथ चौधर यांनी केले होते. पंच म्हणून जिल्हा संघाचे सचिव प्रदीप बोत्रे, सागर मरकड, सागर माने, अनिल तरंगे, गणेश जाधव, श्रावण चोरमले यांनी काम पाहिले. समालोचन प्रशांत भागवत यांनी केले.

स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे : माती विभाग : 57 कि. -राहूल टकले (कानाडवाडी), 61 कि. -महेश वायाळ (मगरवाडी), 65 कि.- सौरभ टकले (ढेकळवाडी), करण चौघुले (माळेगाव), 70 कि. - आदित्य शिंदे (सस्तेवाडी), प्रवीण शेलार (मगरवाडी), 74 कि.- सागर वाघमोडे (काटेवाडी), पवन मचाले (माळेगाव), 79 कि- संतोष पडळकर (सस्तेवाडी), 86 कि.- महेश खोमणे (कोर्‍हाळे), तुषार गव्हाणे (माळेगाव), 92 कि- अंगद बुलबुले (गुणवडी), गौरव लडकत (शेरेवाडी), 97 कि- वैष्णव शिंदे (बारामती), रोहन टकले (ढेकळवाडी), 125 कि. भारत मदने (निरावागज), विवेक सानप (रुई)

गादी विभाग : 57 किलो- हर्षद केसकर (मगरवाडी), किरण शेडगे (बारामती), 61 कि. - श्रेयस वाईकर (करंजेपूल), रोशन टकले (ढेकळवाडी), 65 कि- प्रथमेश कोळपे (मगरवाडी), साईराज माने (पळशी), 70 कि. - प्रथमेश तावरे (मोरगाव), जय झांबरे (मळद), 74 कि. - रामा घोरपडे (मगरवाडी), श्रीहरी कोकरे (पणदरे), 79 कि- साईराज जाधव (तांदूळवाडी), प्रतिक ओवेकर (गुणवडी), 86 कि- शिवाजी टकले (सस्तेवाडी), साद पठाण (माळेगाव), 92 कि- शंकर माने व प्रथमेश घाडगे (बारामती), 97 कि- अभिषेक देवकाते (निरावागज), तुषार गावडे (मळद), 125 कि. - सोमनाथ डोंबळे (पानसरेवाडी), रोहन जाधव (बारामती).

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news