Maharashtra Heavy Rainfall : माथेरानमध्ये ४०० तर डोंगरवाडीत ३९८ मिमी; २४ तासांत हंगामातील सर्वोच्च पावसाची नोंद

मुंबई, उपनगरे, कोकण, पुणे-सातारा घाटमाथ्यासह विदर्भात अतिवृष्टी
Maharashtra Heavy Rainfall
Published on
Updated on

पुणे : माथेरान या थंड हवेच्या ठिकाणी ४०० मिलीमीटर, तर घाटमाथ्यावरील डोंगरवाडीत गेल्या २४ तासांत ३९८ मिलिमीटर पावसाची सर्वोच्च नोंद झाली आहे. हा यंदाच्या पावसाळ्याच्या हंगामातील सर्वाधिक पाऊस ठरला आहे. या मुसळधार पावसामुळे कोकणसह मुंबई शहर, मुंबई उपनगरे, पुणे-सातारा घाटमाथा आणि विदर्भातील अनेक भागांत अतिवृष्टी झाली आहे.

गेल्या १०० तासांपासून संपूर्ण राज्यावर पावसाची संततधार सुरू असून, मुंबईसह कोकण व मध्य महाराष्ट्रातील घाटमाथ्याला पावसाने झोडपून काढले आहे. दुसरीकडे मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मध्यम ते संततधार पाऊस सुरू आहे. पावसाचा हा जोर सोमवारपर्यंत कायम राहणार असून, मंगळवारपासून (दि. ७ जुलै) तो ओसरण्यास सुरुवात होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

राज्यात कुठे, किती पाऊस झाला? (मुख्य आकडेवारी - मिलीमीटरमध्ये)

कोकण : माथेरान ४००, कर्जत २९१, पनवेल २८२, खालापूर २७४, पालघर २७३, कुलाबा २६६, पेण २६५, मुरुड २५८, सुधागड-पाली २२२, म्हसळा २१८, राजापूर २१६, अंबरनाथ २०८, ठाणे २०७, दापोली २०२, तळा १९२, माणगाव १८८, कणकवली १८०, वसई १७९, रोहा १७१, हरणे १५७, उल्हासनगर १५३, उरण १४८, वाकवली १४४, मुरबाड १३६, चिपळूण १३२, मंडणगड १२५, वैभववाडी १२४, खेड १२२, महाड १२१, कल्याण ११४, भिवंडी ११२, पोलादपूर १११, देवगड १०६, रामेश्वर १०५, श्रीवर्धन १०२, वाडा ९४, लांजा ९४, सावंतवाडी ९४, वाळपोई ८५, गुहागर ७६, शहापूर ७५.

मध्य महाराष्ट्र : राधानगरी २३८, लोणावळा २१३, महाबळेश्वर १९८, गगनबावडा १९१, आजरा ९३, वडगाव मावळ ९३, इगतपुरी ८७, मुळशी ८२, जुन्नर ७९, पुणे-चिंचवड ७७, चंदगड ७२, वेल्हे ६१, आंबेगाव-घोडेगाव ५४, शाहूवाडी ५१, चाळीसगाव ५०, पाचोरा ५०.

मराठवाडा : जाफराबाद ४९, भोकरदन ४१, सIllोड ३८, देगलूर २९, परळी वैजनाथ २७, फुलंब्री २२, सोयगाव २०.

विदर्भ : सालेकसा १२०, तिरोडा ८७, आमगाव ७८, कोरपना ६१, साकोली ४७, लोणार ४०, देऊळगाव राजा ४०, नेर ३७, जिवती ३६, पांढरकवडा ३५.

घाटमाथा : डोंगरवाडी ३९८, भिरा ३८६, ताम्हिणी ३१०, खोपोली २८५, शिरगाव २७५, दावडी २६८, लोणावळा २६३, अंबोणे २४९, वळवण २२९, कोयना २१०, लोणावळा १७५, खंद १६५, भिवपुरी १५४, धारावी १३५, वानगाव १३४, ठाकूरवाडी १२२.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news