

Heavy rain in Maharashtra
पुणे: राज्यात पुन्हा एकदा पावसाची तीव्रता वाढण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, तसेच विदर्भात पुढील काही दिवस मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तेलंगणा, आंध्र प्रदेशमध्ये बुधवारी अतिवृष्टी, तर छत्तीसगड, ओडिशा, पश्चिम बंगाल, बिहार, झारखंड, पूर्व मध्य प्रदेश, पूर्व विदर्भाच्या भागात मुसळधार पाऊस झाला.
गुरुवारीदेखील या भागात मुसळधार पाऊस कायम राहणार आहे. कमी दाबाचे क्षेत्र, तसेच अरबी समुद्रावरून येणार्या पश्चिमी वार्यांत वाढ झाल्याने बुधवारपासूनच या भागात पाऊस वाढला आहे. महाराष्ट्र किनारपट्टीवर जोरदार वारे वाहणार असून, समुद्र खवळलेला राहील. राज्याच्या सर्वच भागांत वादळी वारे, विजांचा कडकडाट, मेघगर्जनेसह पाऊस होईल. (Latest Pune News)